Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतीमालाला किफायतशीर किंमत मिळण्यासाठी विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शेतीमालाला किफायतशीर किंमत मिळण्यासाठी विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती

Surajya Digital
Last updated: 2021/12/31 at 5:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर – संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, यामुळे ओरड सुरू असते. शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळावी आणि त्यांना नफा मिळावा, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली असून त्याला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

‘ऍन इंटिलीजेंट सिस्टीम अँड ए मेथड फॉर सिस्टिमेटिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ अग्रिकल्चर गुड्स’ असे या सॉफ्टवेअरचे नाव असून त्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट प्राप्त झाला आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे यांना यासंबंधी पेटंट जाहीर झाला आहे. शेतीमालाच्या तसेच विविध कृषी वस्तूंच्या किंमत निर्धारणसंबंधी आणि वितरणासंबंधी हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोणत्या वेळी कोणते पीक घ्यावे, त्याचबरोबर विविध शेती मालाला कोणत्या कालावधीमध्ये भाव प्राप्त होतो तसेच कोणत्या विभागांमध्ये त्या पिकाला दर मिळतो हे विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर मार्गदर्शन करू शकते.

विभागनिहाय बाजारमूल्य आणि माहिती या विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच त्या माध्यमातून जिल्हानिहाय विक्री व वितरण व्यवस्था देखील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून योग्य पद्धतीने करता येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळून त्यांचा उत्पन्न वाढण्यासाठी या विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

विद्यापीठाकडून शेतीमालाच्या किफायतशीर किमतीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचा शेतकऱ्यांना व शासनाला फायदा होण्यासाठी एक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे अर्थशास्त्र विभागाचे डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Production #special #software #university #affordable #prices #agricultural #products, #शेतीमाल #किफायतशीर #किंमत #विद्यापीठ #सॉफ्टवेअर #निर्मिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अकलूजमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी झोपडीत रंगली साखर शाळा
Next Article पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?