बार्शी प्रतिनिधी
बार्शी शहरात छुप्या मार्गातून ड्रग्ज विकण्यास आलेल्या तिघा माफियांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याकडून 13 लाख 2 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देलाल जप्त केला. ही कारवाई गुरूवारी मध्यरात्री परंडा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली.या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.त्यामुळे आरोपींकडून बरीच धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.या तिघांवर धाड टाकल्यानंतर त्यांच्याकडे पिस्तूल आण काडतुसे सापडली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरूवार दिनांक 17 एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान शहरातील परंडा रोड पेट्रोल पंपा जवळ समोरील बाजूच्या रोड लगत बार्शी येथे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बार्शी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 353/2025 एन डी पी एस ऍक्ट कलम 8(क),22(ब),29 तसेच सहकलम भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे असद हसन देहलूज वय 37 वर्ष राहणार पल्लागल्ली परंडा, मेहङ्गूज मोहम्मद शेख वय 19 वर्ष राहणार बावची तालुका परंडा, सर्ङ्गराज उर्ङ्ग गोल्डी असलम शेख वय 32 वर्ष राहणार कसबा पेठ काजी गल्ली बार्शी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत असद हसन देहलूज यांच्याकडे दहा लाख रुपये किमतीची टोयाटो कंपनीची पांढर्या रंगाची कोरोला आलटीस कार होती. 91 हजार 900 रुपये किमतीचे चार प्लास्टिकचे पाऊच होते. त्यामध्ये एकूण 09 पॉईंट 19 ग्रॅम वजनाचा मॅङ्गेड्रोन अमली पदार्थाचे पाऊच होते. या आरोपीचे पॅन्टचे कमरेत खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्तूल सापडले तसेच त्याच्या डाव्या पॅन्टच्या खिशामध्ये पितळी धातूचे दोन जिवंत राऊंड सापडले.
मेहङ्गूज मोहम्मद शेख याच्याकडे 57 हजार 300 रुपये किमतीचे दोन प्लास्टिकचे पाऊच होते. सरङ्गराज उर्ङ्ग गोडी असलम शेख यांच्या जवळ 51 हजार दोनशे रुपये किमतीचे तीन प्लास्टिकचे पाऊच होते. त्यामध्ये एकूण पाच पॉईंट बारा ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ पाऊच होते. बार्शी सारख्या निमशहरी ग्रामीण भागात महानगरातील ड्रग्ज च्या विक्रीचे रॅकेट पसरले आहे. त्याामुळे या कारवाईने बार्शी तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे.
तुळजापूरनंतर बार्शी…
काही दिवसांपूर्वी तुळजापूरला ड्रग्ज माफियांचा विळखा पडला होता.त्यात मंदिराच्या पुजार्यांचाही हात होता असे पोलिसांच्या तपासात आढळून आले होते. तुळजापूरच्या ड्रग्जप्रकरणी 10 हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात नुकतेच दाखल करण्यात आले आहे.त्यानंतर लागलीच बार्शीत ड्रग्ज माफिया सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.