Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हक्काच्या ‘एफआरपी’ पासून शेतकरी वंचित; सुरुवातीस आक्रमक असणाऱ्या शेतकरी संघटना मवाळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

हक्काच्या ‘एफआरपी’ पासून शेतकरी वंचित; सुरुवातीस आक्रमक असणाऱ्या शेतकरी संघटना मवाळ

Surajya Digital
Last updated: 2023/02/07 at 4:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 ‘एफआरपी’साठी नियमावली करणे गरजेचे》 कारखानानिहाय ३१ जानेवारीअखेर थकीत एफआरपी (कोटी रुपयांत)

□ हंगाम अंतिम टप्प्यावर तरी ७८६.६९ कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत

 

सोलापूर : सोलापूर विभागातील ५० साखर कारखान्यांकडून यंदाच्या हंगामातील ३१ जानेवारीपर्यंतचे ‘एफआरपी’चे बेसिक रिकव्हरीप्रमाणे २८३०.८० कोटी रुपये रक्कम ऊसबिलाच्या स्वरुपात शेतकऱ्यांना मिळाले.  Farmers deprived of right ‘FRP’; At the beginning, the aggressive farmers organization Mawal Osmanabad Solapur पण यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला, तरी शेतकऱ्यांना एफआरपी मिळू शकलेली नाही. यंदाच्या हंगामातील आतापर्यंत ७८६.६९ कोटी रुपये एफआरपीचे कारखान्यांकडे थकीत आहेत.

 

यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३७ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ अशा एकूण ५० कारखान्यांनी विभागात गाळप हंगाम घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे २२४०.०३ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी ५९०.७७ कोटी रुपये जानेवारीअखेर दिले आहेत.
असे असले तरीही सोलापूर जिल्ह्यातील २९ कारखान्यांकडे एफआरपीचे ६९६.९१ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ कारखान्यांकडे ८९.७८ कोटी रुपये थकीत आहेत.

 

गळीत हंगामाच्या सुरुवातीस आक्रमक होत ‘कोण म्हणतो देत नाय…घामाचा दाम घेतल्या शिवाय राहत नाय’.. अश्या घोषणा देत आंदोलनाचे इशारे देणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना या थकित एफआरपी साठी ‘ब्र’ शब्द काढताना दिसत नसूनही मवाळ झाल्या असल्याचे चित्र आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने अनेक कारखान्यांनी ऊसाची पळवापळवी करीत ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धावपळ करीत असताना कारखानदारांमध्ये ऊस दराची स्पर्धा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, तसे न होता उलट थकीत एफआरपी वाढतच गेली आहे. त्यातच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. या थकीत एफआरपी शेतकऱ्यांना मिळाव्यात, अशी मागणी ऊस उत्पादकातून केली जात आहे.

 

》 ‘एफआरपी’साठी नियमावली करणे गरजेचे

पुढील हंगाम चालू व्हायची वेळ आली तरीही एफआरपीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. साखर आयुक्तालयाने पंधरवड्याचा एफआरपी अहवाल घेताना कारखान्यांसाठी नियमावली तयार करून त्यासाठी यंत्रणा उभारायला हवी.

कारखान्यांनी प्रत्येक पंधरवड्यात ऊसबिलाच्या याद्या बँकांना देऊन त्या बँकांकडून प्रमाणित करून घेण्याचे बंधन घालायला हवे, अशा प्रमाणित केलेल्या याद्याच साखर आयुक्तालयाने स्वीकारायला हव्यात.
जेणेकरून कारखान्यांनी प्रत्येक पंधरवड्यात दिलेली एफआरपी व थकीत एफआरपीचा वस्तुनिष्ठ आकडा समोर येईल व शेतकऱ्यांना वेळच्यावेळी एफआरपी मिळेल.

》 कारखानानिहाय ३१ जानेवारीअखेर थकीत एफआरपी (कोटी रुपयांत)

 

☆ सोलापूर जिल्हा :

सिद्धेश्वर-२५.३२, संत दामाजी-१३.१०, श्री मकाई-२०.२९, संत कुर्मदास-१३.१०, सासवड माळी-१५.०, लोकमंगल (बीबीदारफळ)-८.३८, लोकमंगल (भंडारकवठे)-२३.६३, सिद्धनाथ-४९.२१, जकराया-१४.०८, इंद्रेश्वर-१२.५३, भैरवनाथ (विहाळ)-३३.१६, भैरवनाथ (लवंगी)-३५.४३, युटोपियन-२८.८४, मातोश्री शुगर-१९.२९, भैरवनाथ (आलेगाव)-१९.४३, बबनरावजी शिंदे- १३.६७, ओंकार-०.३२, जयहिंद-१४.३७, विठ्ठल रिफाइंड-४१.६२, आष्टी शुगर-९.४६, भीमा-४८.०३, सहकार शिरोमणी-३६.२६, सीताराम महाराज-२.४२, धाराशिव (सांगोला)-१५.५३, श्री शंकर-३१.७१, आवताडे शुगर्स-२४.०७, विठ्ठल (गुरसाळे)-५५.९१, येडेश्वरी-४.९०.

☆ उस्मानाबाद जिल्हा :

 

विठ्ठलसाई-१४.१४, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-२.३१, भैरवनाथ (वाशी)-१०.६७, धाराशिव (कळंब)-१३.७०, भैरवनाथ (सोनारी)-२५.७३, लोकमंगल माऊली-१९.४४, क्यूनर्जी-२.८८, डीडीएनएसएफए-०.९१.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Farmers #deprived #right #FRP #beginning #aggressive #farmers #organization #Mawal #Osmanabad #Solapur, #सोलापूर #उस्मानाबाद #हक्क #एफआरपी #शेतकरी #वंचित #सुरुवातीस #आक्रमक #शेतकरी #संघटना #मवाळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Lunch Diplomacy ‘राधाश्री’वर रोहित पवारांची ‘लंच डिप्लोमसी’, राजकीय वर्तुळात खमंग चर्चा
Next Article ‘तम तम मंदी’तील तीन आमदार; कोण होणार नामदार ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?