Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लाचखोरीच्या दोन कारवाई; कृषी विस्तार अधिकारी आणि तलाठ्यास अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

लाचखोरीच्या दोन कारवाई; कृषी विस्तार अधिकारी आणि तलाठ्यास अटक

Surajya Digital
Last updated: 2022/06/02 at 9:04 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
● माढ्यातील तलाठ्यास अटकस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● मार्कंडेय सहकारी रूग्णालयाची निवडणूक होणार जाहीर

सोलापूर : एक हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता ५०० रुपये स्वीकारले असताना कृषी विस्तार अधिकारी संदिप रामदास गावडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रंगेहात पकडले. Two acts of bribery; Agriculture Extension Officer and Talatha arrested

यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडीलांचे नावे जिल्हा परीषद सेस अंतर्गत डी बी टी योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशिन अनुदान मिळणेकरीता कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग येथे अर्ज सादर केला असुन सदर अर्जाचा पाठपुरावा यातील तक्रारदार करीत असताना आलोसे संदिप रामदास गावडे, कृषी विस्तार अधिकारी, कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग यांनी सदर अर्जामधील बँक अकाउंट नंबर चुकला असल्याचे सांगुन सदर अकाउंट नंबर दुरुस्त करण्याकरीता १ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती ५०० रुपये स्विकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग, कार्यालयात स्वतः स्विकारलेवरुन त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

● माढ्यातील तलाठ्यास अटक

 

शेतातील महोगणी झाडांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी चार हजाराची लाच घेताना मोडनिंबच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

महेशकुमार मनोहर राऊत (तलाठी, रा- मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर, रा. मेडशिंगी, ता. सांगोला) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांची मौजे मोडनिंब येथे क्र. ५२२ वर ५८ आर बागायत शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीपैकी ४० आर शेतजमीनीवर महोगनी झाडाची लागवड केली असून, त्याबाबत सात बारा उताऱ्यावर पिकपाण्याची लावण्यासाठी चार हजाराची लाच घेताना मोडनिंबच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

गावकामगार तलाठी महेशकुमार राऊत यांनी तक्रारदारांच्याकडे ४०००/ रुपये लाचेची मागणी करून तो स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी याला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

 

● मार्कंडेय सहकारी रूग्णालयाची निवडणूक होणार जाहीर

#Markandey #मार्कंडेय #solapur #सोलापूर #निवडणूक #election

सोलापूर : सोलापुरातील महत्वाच्या रूग्णालयामध्ये श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे नाव घेतले जाते. या रूग्णालयाची निवडणूक लागणार हे पक्के झाले असले तरी निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याबाबत शहरवासियांना उत्सुकता आहे.

 

पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम ११ जूननंतर जाहीर होणार असून मंगळवारी (ता. 31) जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी रुग्णालयाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. अंतिम मतदार यादीत एकूण १,७७९ मतदार आहेत.

मे महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या रुग्णालयाच्या प्रारूप मतदार यादीवर एकूण २१ जणांच्या हरकती आल्या. या हरकतींवर २३ तारखेला सुनावणी झाली आणि मंगळवार, ३१ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

व्यक्तिगत सभासद यादीतून एकाचे आणि संस्थात्मक सभासद यादीतून दोघांचे असे एकूण तिघांचे नाव सभासद यादीतून जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी वगळले आहे.

एकूण १८ जागांसाठी निवडणूक होणार असून, रुग्णालयावर आपली वर्णी लागावी, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. व्यक्तिगत सभासद १६०८, संस्थात्मक सभासद १२४ तसेच डॉक्टर वर्गात सभासद ४७ असे एकूण १ हजार ७७९ सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्यक्तिगत गटातून ५ जागा, संस्थात्मक गटातून ५ जागा तसेच डॉक्टर गटातून ३ जागा, महिला गटातून २ जागा, अनुसूचित जाती गटातून १, इतर मागासवर्गीय गटातून १ तसेच भटक्या जमाती गटातून १ अशा एकूण १८ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक नियोजित आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Two #acts #bribery #Agriculture #Extension #Officer #Talatha #arrested #Markandey #Hospital #Election, #लाचखोरी #दोन #कारवाई #कृषी #विस्तार #अधिकारी #तलाठी #अटक #मार्कंडेय #रूग्णालय #निवडणूक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोटच्या मुलीच्या अत्याचार आणि हत्याप्रकरणी निर्दयी आई – बापास मरेपर्यंत फाशीची शिक्षा
Next Article Singer KK गायक केके अनंतात विलीन; अलविदा ! संगीत विश्वातील सुपरस्टार, वाचा पूर्ण कहाणी

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?