Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दोन मजली गोठ्यात 60 म्हशींचा सांभाळ करत ‘श्रद्धा’ लावतीय कुटुंबाला ‘हातभार’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रशिवार

दोन मजली गोठ्यात 60 म्हशींचा सांभाळ करत ‘श्रद्धा’ लावतीय कुटुंबाला ‘हातभार’

Surajya Digital
Last updated: 2020/11/29 at 11:59 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अहमदनगर : दोन मजली गोठा कधी पाहिलाय, ऐकलंय का, नाही ना तर अहमदनगरमध्ये एका युवतीने दोन मजली गोठा बांधून तब्बल 60 म्हशींचा सांभाळ करतीय. आजही समाजात अनेक ठिकाणी कुटुंबात मुलीला दुय्यम स्थान दिलं जातं आणि मुलाला कुटुंबप्रमुख म्हणून पुढं आणलं जातं. कारण मुलाची कर्तबगारी सर्वमान्य आहे. ही समजूत श्रद्धाने खोडून टाकलीय. वाचा सविस्तर श्रद्धा ढवणची कामगिरी.

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील युवतीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत 1 नाही 2 नाही तर तब्बल 60 म्हशींचा सांभाळ करून कुटुंबाला हातभार लावला आहे. श्रद्धा ढवण असं या तरुणीचं नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहणारी श्रद्धा मुलीकादेवी महाविद्यालयात श्रद्धा TYBSc मध्ये शिक्षण घेत आहे.

कुटुंबामध्ये मुलगा हा घरातील जबाबदारी अंगावर घेतो. असं असलं तरी आता हा पायंडा मोडत आहे आणि मुली देखील समर्थपणे घराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वीरीत्या घराचा गाडा हाकत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे श्रद्धा ढवण आहे. तिने आत्मनिर्भर बनून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* कुटुंबाचा सर्व भार श्रद्धावर

श्रद्धाचे वडील दिव्यांग, लहान बहीण पुण्यात शिक्षण घेत आहे तर भाऊ दहावीत शिकत आहे. त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार श्रद्धा आणि तिच्या आईवर आला. त्यामुळे घरी असलेल्या 4 म्हशींचा सुरुवातीला श्रद्धाने सांभाळ केला. आणि हळूहळू तब्बल 60 म्हशींचा सांभाळ करत श्रद्धा आत्मनिर्भर बनली. घराजवळच तिने या म्हशींसाठी 2 मजली गोठा देखील बांधला. म्हशींसाठी 2 मजली गोठा जिल्ह्यात पहिलाच उपक्रम आहे.

* श्रद्धाचा रोजचा दिनक्रम

पहाटे लवकर उठून स्वतः चे आवरणे आणि त्यानंतर मग गोठा, म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर नेऊन घालणे हे कामे श्रद्धा करते. इतकेच नाही तर म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामे करून संध्याकाळी अभ्यास करणे असा श्रद्धाचा रोजचा दिनक्रम आहे. स्वतःचे शिक्षण करून घराला हातभार लावत असल्याने श्रद्धाच्या आईला देखील तिचा अभिमान वाटतो. इतकेच नाही तर गावातील लोक देखील श्रद्धाचे कौतुक करत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #दोनमजली #गोठ्यात #60म्हशींचासांभाळ #श्रद्धालावतीय #कुटुंबाला #हातभार #अहमदनगर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लिफ्टमध्ये मुलांना एकट सोडू नका, दरवाज्यात अडकून मुंबईत चिमुकल्याचा मृत्यू
Next Article देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो – उदयनराजे

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?