Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पठाणकोटमध्ये वायूदलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पठाणकोटमध्ये वायूदलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग

admin
Last updated: 2025/06/13 at 3:55 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

चंडीगढ़, १३ जून (हिं.स.) : पंजाबमधील पठाणकोटच्या नंगलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हलेड गावात भारतीय वायूदलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

हे हेलिकॉप्टर पठाणकोट वायूदलाच्या तळावरून सरावासाठी उड्डाण करत होते. मात्र, उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणी आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोकळ्या मैदानात लँडिंग करण्यात आले.

हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. मात्र सुरक्षारक्षकांनी त्वरित परिसराची नाकेबंदी केली आणि सुरक्षिततेची काळजी घेतली.

घटनास्थळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचा हवाला देत यावर भाष्य करण्यास नकार दिला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेस कोणताही धोका नसल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे, एका आठवड्यात अपाचे हेलिकॉप्टरची ही दुसरी आपत्कालीन लँडिंग आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात ६ जून रोजी देखील अशाच प्रकारे तांत्रिक बिघाडामुळे अपाचे हेलिकॉप्टरची लँडिंग करण्यात आली होती.

You Might Also Like

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी

विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर

शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस

इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता

इस्रायल-इराण तणाव : एअर इंडियाची 12 विमाने माघारी किंवा अन्यत्र वळवली

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इस्रायल-इराण तणाव : एअर इंडियाची 12 विमाने माघारी किंवा अन्यत्र वळवली
Next Article पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता

Latest News

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी
देश - विदेश June 13, 2025
मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी
महाराष्ट्र June 13, 2025
विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर
देश - विदेश June 13, 2025
शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती
महाराष्ट्र June 13, 2025
शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस
देश - विदेश June 13, 2025
इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता
देश - विदेश June 13, 2025
बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन
महाराष्ट्र June 13, 2025
सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात
सोलापूर June 13, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?