Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान रद्द

admin
Last updated: 2025/06/17 at 6:19 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अहमदाबाद, 17 जून (हिं.स.)। अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर विमान उड्डाणांबाबत बरीच खबरदारी घेतली जात आहे. अशातच आता आज(दि.17) पुन्हा एकदा अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.यामुळे अचानक एअर इंडियाचे विमान AI-159 रद्द केले आहे.त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर पुन्हा एकदा एअर इंडियाचे विमान अहमदाबादेतूनच लंडनला जाणार होते. परंतु उड्डाणापूर्वी त्याची तपासणी करण्यात आली असता, त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यामुळे विमानाची उड्डाण ऐनवेळी रद्द करण्यात आली. अचानक उड्डाण रद्द केल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. या विमानातील बहुतांश प्रवासी इतर शहरातील आहेत. आता या विमानाची उड्डाण कधी होणार, हे अद्याप सांगण्यात आले नाही.

अहमदाबादच्या झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत बिघाडाच्या बातम्या येत आहेत. सोमवारी (दि.१६) हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाची तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली, तर अमेरिकेहून मुंबईला येणाऱ्या एका विमानाला कोलकातामध्ये उतरवावे लागले.

तर कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6ई 2706 ला आज(दि.१७) सकाळी 9.20 वाजता बॉम्बची धमकी मिळाली, त्यानंतर ते नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार, तात्काळ एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये विमान क्रमांकाचाही स्पष्ट उल्लेख असल्याने धोका गंभीर असल्याचे मानण्यात आले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या सेवेसाठी भाजपा सदैव कटिबद्ध – रविंद्र चव्हाण
Next Article प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही : पुणे मनपा आयुक्त

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?