Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

admin
Last updated: 2025/06/07 at 4:36 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

गंगटोक, ७ जून, (हिं.स.) –

उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी

एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या शेवटच्या उड्डाणासह पूर्ण झाली. अंतिम उड्डाणात, एमआय-१७

हेलिकॉप्टरने सैन्याच्या जवानांना पाक्योंग ग्रीनफिल्ड विमानतळावर सुरक्षित

पोहोचवले.

पाक्योंग येथील जिल्हा

माहिती अधिकारी यांच्या माहितीनुसार, शनिवारी तीन एमआय-१७ हेलिकॉप्टरद्वारे एकूण ७६

सैनिकांना पाक्योंग ग्रीनफिल्ड विमानतळावर आणण्यात आले. यानंतर छातेन परिसरातून

समन्वय साधून चालवण्यात आलेली ही बचाव मोहीम पूर्ण झाली आहे. शुक्रवारीच उत्तर

सिक्किममध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते.

आपत्तीग्रस्त भागांतून सुमारे २००० पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांचा यशस्वीरीत्या

बचाव करण्यात आला.

शनिवारी सकाळी उत्तर सिक्किममध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे सुरू असलेल्या मदत आणि बचाव

कार्याच्या पार्श्वभूमीवर, दोन एमआय-१७ हेलिकॉप्टरने आवश्यक मदत सामग्री

घेऊन पाक्योंग विमानतळावरून उड्डाण केले. यामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाचे

पाच अधिकारी तसेच लष्कर व नागरिकांसाठी एकूण १३०० किलो मदत सामग्री पाठवण्यात आली.

राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून प्रभावित नागरिकांना

आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.

उत्तर सिक्किममध्ये

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन

झाले आहे. परिणामी, वाहतूक व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली आणि अनेक

पर्यटक अडकले. स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. हवामान सुधारताच हवाई बचाव

मोहिमा सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर, स्थानिक रहिवासी आणि

लष्करी जवानांसाठी आवश्यक वस्तूंची पुर्तता हवाई मार्गाने करण्यात आली.

राज्य प्रशासन आणि

सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचले असून,या बचाव मोहिमेचे

सर्वत्र कौतुक होत आहे.

You Might Also Like

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा

पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण

मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इलॉन मस्क करणार नव्या राजकीय पक्षाची घोषणा ?
Next Article पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?