मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहे. खबरदारी म्हणून अजित पवार यांना रुग्णालयात अॅडमिट केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या चार दिवसांपासून होम क्वॉरन्टाईंन आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांची कोरोना चाचणीही आता पॉझिटिव्ह आली आहे.
त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांना आज सोमवारी सकाळी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहिती देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार मागील आठवड्यात पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली असली तरी थकवा असल्याने त्यांनी घरीच राहून आराम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अजूनही थकवा असल्याने खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.