Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पार्थविषयी मला काहीही बोलायच नसल्याचे अजित पवारांचे वक्तव्य; आज उपमुख्यमंत्री बारामती दौ-यावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

पार्थविषयी मला काहीही बोलायच नसल्याचे अजित पवारांचे वक्तव्य; आज उपमुख्यमंत्री बारामती दौ-यावर

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 1:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच यावर अजित पवार यांची भूमिका काय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र, बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे. मला कुणाशीही काही बोलायचं नाहीय. मला माझं काम करायचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणलंय, असं म्हणत अजित पवारांनी पार्थ पवार प्रकरणावर बोलण्याचं टाळलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, काल शनिवारी पार्थ पवार एकटेच काका श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवारांच्या भेटीला गेले होते. पवार कुटूंबियांकडून पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पार्थ पवारांनीही काल माध्यमांशी बोलणे टाळले, याविषयावर काही बोलायचं नसल्याचे म्हटल्याचे वृत्त आहे.

अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. बारामती मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार बारामतीत आहेत. विशेष म्हणजे पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

* आज कथित वादळ शमण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. तसेच ते विविध विकासकामांची करणार पाहणी करणार आहेत. यादरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आढावा बैठक घेतील आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ देतील. मात्र त्याचवेळी ते कुटुंबात निर्माण झालेल्या तणावाबाबतही घरातील सर्व सदस्यांची चर्चा करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यानंतर तरी पवार कुटुंबात निर्माण झाले कथित वादळ शमण्याची शक्यता आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You Might Also Like

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

TAGGED: #अजितपवार #पार्थविषयी #उपमुख्यमंत्री #बारामती #दौ-यावर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेस आणि भाजपाकडून अॉफर होती; कंगणाकडून राजकारणाच्या प्रवेशावरुन विधान
Next Article सिंधुदुर्गमध्ये शनिवारी 30 पॉझिटिव्ह रुग्ण; रुग्णसंख्या 600 च्या घरात

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?