Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “दादा, आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रHot Newsराजकारण

“दादा, आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये”

Surajya Digital
Last updated: 2020/08/15 at 6:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिश्कील टोला लगावला. स्वातंत्र्यदिनी राज्यपालांच्या हस्ते पुण्यात शासकीय ध्वजारोहण झाले. पार्थ पवार प्रकरणानंतर अशा काही घडमोडी घडत आहेत की, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावू लागल्या आहेत.

पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी राज्यपालांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या वेळी अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ चांगलीच गाजली होती. राज्यपालांनी दोनदा उपमुख्यमंत्र्यांची शपथ एकमेव व्यक्ती अजित पवार यांना चांगले लक्षात ठेवले आहे. त्यावेळी शपथ देणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्याशी अजित पवार यांचे खास सूर जुळले आहेत. त्यामुळे ही शाब्दिक टोलेबाजी रंगली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ध्वजारोहण संपल्यावर राज्यपाल आणि अजित पवार यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी “दादा, आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये” असा मिश्कील डायलॉग राज्यपालांनी ऐकवला. त्यावर मास्कमधूनच दोन्ही हात जोडूध अजित पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांना दंडवत घातला.

दरम्यान, पुण्यात कौन्सिल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

TAGGED: #अजितपवार #राज्यपाल #कोशियारी #परमिशन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील; 424 कोटींचा आराखडा तयार, पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
Next Article राज्यातील पहिल्या टेलिआयसीयू प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ; पाच जिल्ह्यात लवकरच कार्यान्वित

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?