छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर। आज बुधवारी सकाळी बीड जिल्हा रूग्णालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कॅथलॅबचे लोकार्पण संपन्न झाले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बीड येथे दाखल झाले आहेत. आज सकाळी त्यांनी थेट विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाला आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचा आढावा देखील घेण्यात आला.
