वाराणसी : प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळून आला. तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र आता या प्रकरणात आकांक्षाची आई मधू यांनी, गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनी माझ्या मुलीची हत्या केली, असा आरोप केला आहे. या दोघांनी माझ्या मुलीचे कोट्यवधी रुपये दिले नव्हते, संजयने आकांक्षाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असेही त्या म्हणाल्या. The murder of Bhojpuri actress Akanksha Dubey; A case has been registered against the missing singer in Varanasi
आकांक्षा दुबे हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता तिच्या आईने गंभीर आरोप केला आहे. आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी मुलीची हत्या गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंहने केल्याचा आरोप केला आहे.
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने बनारसमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. आकांक्षा ही भदोही जिल्ह्यातील चौरीमधील पारसीपूर येथील रहिवासी होती. ती भोजपुरी इंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा होती. आकांक्षाने ‘वीरों के वीर’ व ‘कसम बदना वाले की 2’ या चित्रपटात काम केले होते. अभिनेत्रीने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. आकांक्षाच्या मृत्यूने भोजपुरी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. ती 25 वर्षांची होती. तिने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये गळफास घेत जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी रात्री ती इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. यावेळी ती खूप अस्वस्थ असल्याचे दिसत होते. ती खूप रडल्याचे समजत होते. यावेळी चाहतेही तिला प्रश्न विचारत होते. परंतु ती काहीच बोलत नव्हती.
https://twitter.com/ANI/status/1639948201376591872?t=7PpL-i5Vyj_qz1lnqxx2tw&s=19
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आता याला वेगळेच वळण मिळाले आहे. यात सारनाथ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी भोजपुरी गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अनेक अंगांनी तपास करत आहेत. पोलीस तिच्या मोबाईलची चौकशी करत असून मोबाईलवरून आकांक्षाच्या मृत्यूचे रहस्य उलगडू शकते असे सांगण्यात येत आहे.
मुंबईहून वाराणसीला पोहोचलेल्या आकांक्षाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आकांक्षाची आई मधु म्हणाली की, माझी मुलगी खूप धाडसी होती. ती आत्महत्या करू शकत नाही. त्यांनी पोलिस-प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. सोमवारी सकाळी आकांक्षा दुबेची आई आणि भाऊ पोलीस ठाणे गाठले. वडील छोटे लाल दुबे अजूनही ट्रेनमध्ये आहेत. मधुने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी सात वाजता तिचे आकांक्षाशी मोबाईलवर बोलणे झाले. तेव्हा ती खूश होती.
कोणत्याही समस्येचा उल्लेख केला नाही. रात्री 12 वाजता फोन केला असता तिने फोन उचलला नाही. कोणत्याही पार्टीत जाण्याबाबत सांगितले नाही.
आझमगडचा रहिवासी असलेला भोजपुरी गायक समर सिंह हा आकांक्षाला खूप छळत असे. आकांक्षाने फक्त त्याच्यासोबतच काम करावे, इतर कुणासोबत नाही असे त्याचा हट्ट असायचा. तसेच दुस-याच्या चित्रपटात किंवा गाण्यात काम केल्याबद्दल तो मारहाण करायचा. अनेकवेळा आकांक्षाने त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने मारहाणही केली असल्याचे त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान आरोपी असलेला भोजपुरी गायक समर सिंह रविवारपासून बेपत्ता आहे.
आकांक्षा दुबेची आई म्हणाली की, समर सिंह आणि संजय सिंह यांनी आकांक्षा दुबेचे मागील ३ वर्षापासून कोट्यवधीचे काम करून पैसे रोखले होते. २१ तारखेला समर सिंहचा भाऊ संजय सिंहने आकांक्षा दुबेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आकांक्षाने स्वत: मला याबाबत फोन करून माहिती दिल्याचं आईने सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळणं लागले आहे.
आकांक्षाला आयपीएस अधिकारी बनवण्याचं तिच्या वडिलांचे स्वप्न होते. परंतु तिला डान्स आणि अभिनयाची आवड होती. लहानपणापासून तिला टीव्ही बघण्याची आवड होती. त्यानंतर मॉडेलिंग करत तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्याचं ठरवले.
वयाच्या १७ व्या वर्षी एका मैत्रिणीच्या सहाय्याने आकांक्षाने भोजपुरी सिनेमात पाऊल ठेवले. दिग्दर्शक तिवारी यांच्यासोबत काही सिनेमांमध्ये तिने काम केले. अनेकदा आकांक्षाला रिजेक्शनचाही सामना करावा लागला. २०१८ मध्ये आकांक्षा मानसिक तणावाखाली आली होती. तिने इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आकांक्षाच्या आईने तिची समजूत घातल्यानंतर तिने पुन्हा काम सुरू केले.