अक्कलकोट : येथील प्रियदर्शिनी मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य दुसरे कन्नड साहित्य संमेलन उत्साहात सुरू झाले. कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य घटकांचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी स्वागात केले. प्रारंभी श्री मल्लिकार्जुन मंदिर येथून सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीचे उद्घाटन महेश हिंडोळे, शिवलिंग स्वामी यांच्या हस्ते झाले.
संमेलनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता म.प्र.पूज्य बसवलिंग महास्वामी, श्रीकंठशिवाचार्य महास्वामी, अभिनव शिवलिंग महास्वामी मादनहिप्परगा, डाँ.अभिनव बसवलिंग महास्वामी नागणसुर , चनम्मल महास्वामी तोळणुर यांच्या सानिध्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
संमेलनाचे सर्वाध्यक्षा डॉ.मधुमाला लिगाडे या संमेलनाच्या सर्वाध्यक्षा उपस्थित होते. यावेळी आनंद तानवडे, महेश हिंडोळे, दयानंद बिडवे, रामचंद्र समाणे आदींची प्रमुख व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श कन्नड बळगचे अध्यक्ष मलिकजान शेख यांच्या पुस्तकाचे चिलीपिल्ली काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. महेश म्हेत्रे, अनिता अय्यर, गुरूराज मठपती यांनी कन्नड लोकगीते गायले.
Akkalkot: Inauguration of 2nd Kannada Sahitya Sammelan, colorful cultural programs at night
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दुपारी साडेबारा वाजता कन्नड – मराठी भाषा बांधव्य, दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र राज्यातील साहित्यिकांचे विविध प्रश्न, सायंकाळी साडेचार वाजता कविगोष्ठी आणि सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तोळणुर कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांनीनी स्वागत नृत्य सादर केले.
यावेळी सचिव शरणप्पा फुलारी, गुरुबासू वग्गोली, खजिनदार महेश मेत्री, युवा साहित्यिक गिरीश जकापुरे, आदर्श कन्नडचे अध्यक्ष मलिकाजन शेख, उपाध्यक्ष बसवराज धनशेट्टी, चिदानंद मठपती, राजशेखर उंबरणीकार, सिद्धाराम बिराजदार, बसवराज गुरव, यल्लप्पा इटेनवरू, सिद्रामय्या स्वामी, राजकुमार गोब्बूर, कलमेश अडलहट्टी,श्रीशैल जमादार, शरणू कोळी, संतोष परीट समवेत साहित्यप्रेमी यांनी परिश्रम घेतले.
साहित्यिक डॉ. राजशेखर मठपती, डॉ.रमेश मुलगे, डॉ.सुजाता शास्त्री, डॉ.बी.बी पुजारी, डॉ.दाक्षयणी यडहळ्ळी,गिरीश जकापुरे, एन.आर.कुलकर्णी, सिद्राम होनकल, ए.एस.मकानदार, अ.बा.चिक्कमणुर आदी उपस्थित राहून विचारमंथन केले. संमेलनाला कन्नड साहित्यिक, कन्नड भाषिक, कलाकार कन्नड रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.