Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट । अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतक-यांसाठी 42 कोटी मदत जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

अक्कलकोट । अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतक-यांसाठी 42 कोटी मदत जाहीर

Surajya Digital
Last updated: 2022/10/14 at 7:37 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ अक्कलकोट । वीज पडून पाचजण जखमी; तीन गंभीर जखमी

अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभेतील बाधित आपदग्रस्त शेतकऱ्यांना 42 कोटी मदत जाहीर झाली आहे. शेतीपिकांचे 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या मंडळांना मिळणाऱ्या मदतीचा आदेश निघाला आहे. Akkalkot. MLA Sachin Kalyanshetty announces 42 crore aid for farmers affected by heavy rains

 

चालू पावसाळ्यातील सततच्या अतिवृष्टीने अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झालेबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी अहवाल सादर केला होता. तसा नुकसानभरपाई खासबाब म्हणून देण्यास मान्यता देणारे शासन आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

 

सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे 33 पेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचे क्षेत्रीय स्तरावरून पंचनामे करून ता.22 ऑगस्ट 2022 रोजीचे शासन निर्णयातील विहीत केलेल्या दराने आर्थिक मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा सविस्तर प्रस्ताव पाठविला होता. सदर अहवालानुसार सततच्या पावसाने नुकसान झालेल्या 36383 शेतकऱ्यांचे 21321 हेक्टर पिकावरील नुकसान झाले असून बाधित क्षेत्रासाठी रक्कम रूपये 29 कोटी 36 लाख 14 हजार 400 रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे.

 

माहिती स्रोतानुसार अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, दुधनी, करजगी व किणी मंडळातील शेतकरी अगोदरच 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने ती मंडळे पात्र ठरले आहेत. पण सदर निकषात त्यावेळी न बसलेले परंतु पिकांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याने इतर मंडळांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

 

अखेर त्यावर विचार विनिमय होऊन खास बाब म्हणून अतिवृष्टी मदत निधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. यांचे फलित म्हणजे नव्या निर्णयानुसार अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील उर्वरित मंडळात 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याने वरीलप्रमाणे शेतकरी पात्र ठरून मदत निधी मिळणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी बांधवाना दिलासा मिळणार आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

ज्यात जिरायत क्षेत्रासाठी 35492 शेतकरी पात्र असून 20854 हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे 28 कोटी 36 लाख 14 हजार 400 रुपये तर बागायत पिकांसाठी 613 शेतकरी पात्र असून 378 हेक्टरसाठी 1 कोटी 2 लाख 6 हजार एवढी मदत मिळणार आहे. याशिवाय फळपीक करिता 278 शेतकरी पात्र असून 89 हेक्टर करिता 32 लाख 4 हजार एवढी मदत निधी मिळणार आहे.या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास 36383 शेतकऱ्यांचे 21321 हेक्टर पिकावरील नुकसान झाले असून बाधित क्षेत्रासाठी रक्कम रूपये 29 कोटी 36 लाख 14 हजार 400 रुपये तसेंच दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी 12 कोटी म्हणजे एकूण अक्कलकोट विधानसभा क्षेत्रासाठी 42 कोटी एवढा निधी मंजूर झाला असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

अक्कलकोट तालुक्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस उभ्या पिकात पाणी थांबून खरीप व फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने उर्वरित शेतकरी बांधवानाही मदत निधी दिवाळी पूर्वी मिळाल्यास त्यांना चांगली मदत होणार आहे. जिरायत, बागायत तसेच बहुवार्षिक या सर्व पिकांसाठी आता दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा तसेच जिरायतसाठी 13 हजार 600, बागायतसाठी 27 हजार तर बहुवार्षिकसाठी 36 हजार प्रती हेक्टर एवढी मदत जाहीर झाली आहे.

 

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्ताना तातडीने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी सदर निर्णय घेतल्याने आणि अधिकृत आदेश निघाल्याने शेतकरी बांधवाना अडचणीच्या काळात दिलासा मिळणार आहे. यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अधिवेशन काळात आणि नंतर सुद्धा सतत पाठपुरावा केला होता.

 

□ अक्कलकोट । वीज पडून पाचजण जखमी; तीन गंभीर जखमी

 

अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास वीज पडून पाच जण जखमी झाल्याची घटना शेतामध्ये घडली आहे. त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

 

यात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शिवाजी पंढरी शिंदे (वय ७५), सुमित गुरप्पा कलशेट्टी (वय- १३), गुरप्पा सुभाष कलशेट्टी (वय – ४०), संभाजी शिवाजी मोरे (वय – ३४), अंबिका गुरप्पा कलशेट्टी (वय – १३ ) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. जखमी बादोला रोडकडे असलेल्या शेतीमध्ये काम करत होते.  यानंतर पावसाला सुरुवात होताच एका कढईच्या खाली ते पाच जण दबून बसले होते.

 

यावेळी अचानक साडेतीन वाजण्याच्या सुमारास वीज कडाडली आणि ती वीज अंगावर पडून पाच जण जखमी झाले. याची माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कळताच तातडीने त्यांनी नातेवाईकांना बोलावून अक्कलकोटला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना समजताच तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी ग्रामसेवक तसेच तलाठी चोरमुले यांना घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, सरपंच व्यंकट मोरे, चुंगी सरपंच राजू चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे यांच्यासह अनेकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. या घटनेबाबत प्रशासनाकडूनही योग्य ती कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे.

 

 

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Akkalkot #MLA #SachinKalyanshetty #announces #42crore #aid #farmers #affected #byheavyrains, #अक्कलकोट #अतिवृष्टीने #बाधित #शेतकरी #42कोटी #मदत #जाहीर, #आमदार #सचिनकल्याणशेट्टी #जनतादरबार #आप्पा #एन्ट्री #सिद्रामप्पापाटील #अक्कलकोट #गोल्डनगॅंग #सावध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना मिळणार उपस्थिती भत्ता !
Next Article मोहोळ शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ, 18 जण जखमी

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?