Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन

Surajya Digital
Last updated: 2022/12/25 at 4:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची घटना काल शनिवारी (ता. 24) घडली. Solapur. Akkalkot escape of the accused from the police station

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ कोरड्या विहिरीत पडल्याने विवाहित तरुणी जखमी □ झोपेत ट्रक चालविणाऱ्या ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू

देवराज दिलीप पवार (वय १९, रा. वडार गल्ली) असे आरोपीचे नाव आहे. पवार याच्याविरुध्द दक्षिण पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दक्षिण ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांच्या पथकाने आरोपीला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यासाठी लॉकअपबाहेर काढले.

त्यास प्रथमवर्ग न्यादंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी पोलीस कर्मचारी दासरे व अंगुले यांनी नेले. न्यायालयाने त्यास २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने त्यास पोलीस ठाण्यामध्ये चौकशी व जबाब घेण्यासाठी आणून बसविले. त्यावेळी तो अचानक उठल्याने पोलीस पथकाने त्याच्या हाताला पकडले. त्यावेळी पोलिसाच्या हाताला हिसका देऊन तो पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. या घटनेची तक्रार काकडे यांनी उत्तर पोलीस ठाण्यात दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ कोरड्या विहिरीत पडल्याने विवाहित तरुणी जखमी

सोलापूर – शेळ्या चारत असताना तोल जाऊन कोरड्या विहिरीत पडल्याने २३ वर्षीय विवाहित गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास होटगी (ता.दक्षिण सोलापूर) येथे घडली.
पूजा माधव माने (वय २३ रा.होडगी रोड, दक्षिण सोलापूर) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला उपचारासाठी केशव माने (दीर) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुपारी एक वाजेच्या सुमारास ती शेळ्या चारत होती त्यावेळी कोरड्या विहिरीजवळ तिचा तोल गेल्याने ती विहिरीत पडून जखमी झाली. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

□ झोपेत ट्रक चालविणाऱ्या ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर – ट्रक चालवत असताना झोप लागली आणि ट्रक समोरच्या वाहनाला धडकून गंभीर जखमी झालेल्या ड्रायव्हरचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना रविवारी मृत्यू झाला.

शिवानंद गुंडप्पा ऐवळे (वय ४० रा. आळंद जि. कलबुर्गी) असे मयताचे नाव आहे. तो १५ डिसेंबर रोजी पुणे ते सोलापूर असा ट्रान्सपोर्टचा ट्रक घेऊन प्रवास करीत होता. शेटफळ (ता. मोहोळ) नजीक त्याला झोप लागली. आणि ट्रक समोरच्या वाहनाला पाठीमागून धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Solapur #Akkalkot #escape #accused #policestation, #सोलापूर #पोलीस #ठाणे #आरोपी #पलायन #अक्कलकोट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींनी केला सोलापुरात भाजपचाच उध्दार, पंढरपुरात केली खरडपट्टी
Next Article कारखान्यावर टपलेल्यांच्या तावडीतून कारखाना वाचविला, आता टेन्शन घेवू नका – मुख्यमंत्री शिंदे

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?