Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठा आरक्षणासाठी अक्कलकोटमध्येही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रमुख मार्गावरून काढला मोर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मराठा आरक्षणासाठी अक्कलकोटमध्येही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रमुख मार्गावरून काढला मोर्चा

Surajya Digital
Last updated: 2020/09/21 at 5:30 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

अक्कलकोट : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाने आंदोलनाचा निर्णय घेतला. न्यायालयीन स्थगिती उठवण्यासाठी आज सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला अक्कलकोट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कडकडीत बंदला विविध पक्षीय नेते, विविध समाजाच्या संघटना, व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. सकल मराठा समाजासह विविध जातीधर्मांचे लोक आंदोलानात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या विराट मोर्चात हजारोंच्या संख्येने युवक वर्ग सामील झाला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी जैन समाज संघटनेचे अभय खोबरे, बेलदार समाजाचे अशोक जाधव, वागदरी येथील श्री परमेश्वर आराधना पर्व पालखी महोत्सव समिती व लिंगायत समाज, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, वंचित बहुजन आघाडी, रासप यांनीही पाठिंबा दिला. नायब तहसिलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन दिले.

संघर्ष समितीचे संस्थापक सुरेशचंद्र सुर्यवंशी, श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, सुभाष गडसिंग, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनोज निकम, शितल फुटाणे, प्रविण देशमुख, नितीन शिंदे, वैभव नवले, संजय गोंडाळ, आकाश शिंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रविण घाटगे, अप्पू पराणे आदींची उपस्थिती होती.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #मराठासमाज #आरक्षण #मोर्चा #प्रमुखमार्गावरुन #अक्कलकोट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आमदार सुभाष देशमुखांची राजीनामा देण्याची घोषणा
Next Article भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 12; बचावकार्य चालूच, 40 वर्षांपूर्वीची तीनमजली इमारत कोसळली

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?