Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट । हायकोर्टाचा फडणवीसांना धक्का; आमदार कल्याणशेट्टींच्या प्रस्तावावरील शिफारस केली अमान्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्कलकोट । हायकोर्टाचा फडणवीसांना धक्का; आमदार कल्याणशेट्टींच्या प्रस्तावावरील शिफारस केली अमान्य

Surajya Digital
Last updated: 2022/09/18 at 9:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ प्रथमेश म्हेत्रे यांच्या याचिकेमुळे होणार बदल..!स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ म्हेत्रेंच्या याचिकेमुळे राज्यातील बाजार समितींच्या निवडणुका जाहीर

□ प्रथमेश म्हेत्रे यांच्या याचिकेमुळे होणार बदल..!

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी बाजार समितीवरील संचालक मंडळाची मुदतवाढ रद्द करून त्या ठिकाणी अशासकीय व्यक्तींचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याचा प्रस्ताव अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला होता. या प्रस्तावावर फडणवीसांनी ‘कार्यवाही करावी’ अशी शिफारस करून तो प्रस्ताव पणन विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावावर सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे धाव घेतली होती. झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने फडणवीसांची ती शिफारस अमान्य केली आहे. Akkalkot. High Court’s shock to Fadnavis; The recommendation on MLA Kalyanshetty’s proposal was rejected

 

दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला राज्यातील मुदत संपलेल्या बाजार समितींच्या निवडणुका घेण्यासंदर्भात ७ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. प्राधिकरणाने सहा सप्टेंबर रोजीच बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत बाजार समितीमधील अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्याच्या हस्तक्षेपाला चाप बसला आहे.

 

 

 

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या दुधनी बाजार समितीवर त्यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे सभापती आहेत. या समितीच्या संचालक मंडळाची मुदत २२ डिसेंबर २०२१ रोजी संपली आहे. सरकारने मे २०२२ मध्ये राज्यातील सर्वच बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना २२ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ रद्द करून त्या ठिकाणी मोतीराम राठोड यांना सभापती व सातलिंगप्पा परमशेट्टी यांना उपसभापती करून या मंडळात जयशेखर पाटील, मलकण्णा कोगणूर, दयानंद बमनळ्ळी, मदगोंडा पुजारी, चनय्या पुजारी यांचा प्रशासकीय सदस्य म्हणून समावेश करावा, असा प्रस्ताव आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने तयार केला.

या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यवाही करावी, असा शेरा लिहित हे पत्र पणन विभागाकडे पाठविले. या पत्राचा आधार घेत सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.

 

न्यायालयाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हस्तक्षेप अमान्य करत या बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्तीस तूर्तास नकार दर्शविला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात होणार असून सध्या तरी या न्यायालयातील लढाईत आमदार कल्याणशेट्टीच्या पुढे माजी मंत्री म्हेत्रे व सभापती म्हेत्रे यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे चित्र आहे. यात म्हेत्रे यांच्याकडून ॲड. अभिजीत कुलकर्णी यांनी काम पाहिले.

 

□ म्हेत्रेंच्या याचिकेमुळे राज्यातील बाजार समितींच्या निवडणुका जाहीर

 

राज्यातील जवळपास २८३ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या याचिकेमुळे मोकळा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दुधनी, कुर्डूवाडी, मोहोळ, सांगोला, अकलूज व अक्कलकोट या सहा बाजार समित्यांची निवडणूकीची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली आहे. या सहा बाजार समित्यांची निवडणूक जुन्या पद्धतीने होणार आहे. या सहा समित्यांच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नसल्याचे सध्या तरी स्पष्ट झाले आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Akkalkot #HighCourt's #shock #Fadnavis #recommendation #MLA #Kalyanshetty's #proposal #rejected, #अक्कलकोट #हायकोर्ट #फडणवीस #धक्का #आमदार #कल्याणशेट्टी #प्रस्ताव #शिफारस #अमान्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवारांची एन्ट्री : कधीही न दिसणारे शहराध्यक्ष पोस्टरवर झळकले
Next Article Guava farming सोलापूरच्या शेतकऱ्याचा पेरू केरळच्या बाजारात; किलोला 85 रूपये दर

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?