Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

admin
Last updated: 2025/05/20 at 7:23 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 20 मे (हिं.स.)।अलिकडेचं ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता हा चित्रपट मोठ्या वादात अडकला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट सोडल्याचं सांगितलंय. ते चित्रपटातून बाहेर पडल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. आत यातच अक्षय कुमारने परेश रावल यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

परेश रावल यांनी चित्रपट अर्धवट सोडून दिल्यानं अक्षय कुमारनं परेश रावल यांना तब्बल २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, परेश रावल यांनी आधी चित्रपटासाठी कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता आणि अ‍ॅडव्हान्स रक्कमही घेतली होती. शिवाय काही प्रमाणात शूटिंगही झालं होतं. मात्र नंतर अचानक त्यांनी चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागलं. परेश रावल यांचं हे वर्तन ‘अनप्रोफेशनल’ असल्याचा आरोप अक्षयच्या बाजूने करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर परेश यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “मला इथे स्पष्ट करायचं आहे की ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय हा मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे घेण्यात आलेला नाही. मी पुन्हा सांगतो की माझे फिल्ममेकर्ससोबत कोणताही क्रिएटिव्ह मतभेद झालेले नाहीत. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम, आदर आणि विश्वासाची भावना आहे”.

अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी ‘हेरा फेरी’सह ‘गरम मसाला’, ‘वेलकम’, ‘भूल भुलैया’ अशा अनेक हिट चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. दोघं लवकरच प्रियदर्शन यांच्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, आता परेश रावल या कायदेशीर नोटीशी काय उत्तर देतात, आणि ‘हेरा फेरी ३’चं भविष्य काय ठरतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई-पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन
Next Article भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?