नवी दिल्ली , 23 एप्रिल (हिं.स.)।जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा हल्ला काश्मीर खोऱ्यातील सर्वात घातक हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. आता देशातील इतर शहरांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनापरिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी प्रमुख पर्यटन केंद्रे आणि सीमा चौक्यांवर सुरक्षा वाढवली आहे.
पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी(दि.२३) विविध संघटनांनी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना पर्यटन स्थळे आणि इतर महत्त्वाच्या स्थळांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.जयपूर आणि अमृतसरमध्येही पोलिस सतर्क आहेत. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) प्रशांत कुमार यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश जारी केले आहेत. अयोध्या, काशी आणि मथुरेसारख्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबईत मंत्रालय, विधानसभेसह सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, धार्मिक स्थळे, संवेदनशील ठिकाणी विशेषता पयर्टन स्थळावर अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत विविध हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी अचानक कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली होती. बंदोबस्तात हलर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरातील संवेदनशील व अतिसंवदेनशील परिसरातील बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली आहे. जम्मूमध्येही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काही भागातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.