Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्याची परवानगी द्या, राज्यभर चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्याची परवानगी द्या, राज्यभर चर्चा

Surajya Digital
Last updated: 2021/03/04 at 9:25 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नांदेड : ‘मला मणक्याचा त्रास आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करायचे ठरवले असून कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी द्यावी,’ अशी मागणी नांदेडचे सहायक लेखाधिकारी सतीश देशमुख यांनी रीतसर पत्र लिहून केली. हे पत्र व्हायरल झाले व याची राज्यभर चर्चा सुरु झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समज दिल्यानंतर देशमुखांनी ही मागणी मागे घेत माफीनामा सादर केला आहे. मात्र, इंधन दरवाढीवरुन ही मागणी केल्याचे अनेकांना वाटले.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालतील एका अधिकाऱ्याने ही अशी विचित्र मागणी केली. त्यांनी ऑफिसला येण्यासाठी घोड्याची योजना आखली. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मला पाठीच्या कण्याचा त्रास असल्याने दुचाकीवरुन येताना त्रास होत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावर उपाय म्हणून मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन मला वेळेत घोड्यावर येणं शक्य होईल. त्यामुळे घोडा बांधण्याची मला परवानगी मिळावी. देशमुख यांनी पाठवलेल्या पत्राला पोहोच देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, ही मागणी आता मागे घेण्यात आली आहे.

सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख यांच्या मागणीचा अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. दरम्यान, सहाय्यक लेखाधिकारी देशमुख यांनी आणखी एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना लिहून ही मागणी मागे घेत असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी असा अर्ज का केला? आणि तो नंतर मागे का घेतला? ही बाब मात्र गुलदस्त्यात राहिली आहे. पण, त्यांच्या एका अर्जामुळे सोशल मीडियावर मात्र चर्चांना उधाण आले आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #Allowthehorse #tied #officepremises #statewide #discussion, #कार्यालयीन #परिसरात #घोडाबांधण्याची #परवानगीद्या #राज्यभर #चर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शाळेत जाण्याचा आला कंटाळा, विद्यार्थ्याने केले चक्क शिक्षिकेशी लग्न
Next Article पंतप्रधानांचे भाषण कोण लिहते, किती खर्च येतो? पीएमओ कार्यालयाकडून दिले उत्तर

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?