Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समाजवादी पार्टीचे माजी नेता, खासदार अमर सिंह यांचे सिंगापूरमध्ये निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

समाजवादी पार्टीचे माजी नेता, खासदार अमर सिंह यांचे सिंगापूरमध्ये निधन

Surajya Digital
Last updated: 2020/08/01 at 6:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे माजी नेता, राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते. त्यांना उपचारासाठी सिंगापूर इथल्या दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. उपचादारम्यान त्यांचं निधन झालं आहे.  2013 मध्ये किडनीचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर दुबईत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा राजकीय कामांना सुरुवात केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज अमरसिंह यांनी ट्वीटरवर स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली होती आणि लोकांना ईदच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं नाव होतं. अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात 1996 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झाली होती. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती. एकेकाळी उत्तर प्रदेशातील ते मोठे नेते होते.

समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्यासोबत त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. मात्र नंतर त्यामध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. अमिताभ बच्चनसह इतर मोठ्या अभिनेत्यांबरोबर देखील त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. अमर सिंह यांच्यामुळे समाजवादी पार्टीला मोठा फायदा झाला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती.

अमरसिंह बराच काळ आजारी होते व जवळपास सहा महिन्यांपासून सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत फक्त त्यांची पत्नी होती. मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, अमर सिंह हे आयसीयूमध्ये होते. यापूर्वी  2013 मध्ये अमर सिंह यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. अमर सिंह यांचा जन्म 27 जानेवारी 1956 रोजी आजमगड येथे झाला होता.

अमरसिंह यांचे प्रोफाइल पाहता असे दिसून येते की, आजारी असूनही ते सोशल मीडियावर बर्‍यापैकी अ‍ॅक्टिव होते. समाजवादी पक्षाचे कट्टर नेते असलेल्या अमर सिंह यांचा मार्च महिन्यात एक व्हिडिओ चर्चेत होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूची बातमी ही अफवा असल्याचे सांगितले होते. आपले पूर्वीचे अनुभव सांगताना ते म्हणाले की, त्यांची तब्येत यापूर्वीदेखील खालावली होती, परंतु प्रत्येक वेळी मृत्यूशी लढा देऊन ते परत आले. माञ यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #अमरसिंहनिधन #सिंगापूरमध्येनिधन #मुलायमसिंह #उत्तरप्रदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शीतील रेशन दुकानातून काळाबाजारात गेलेला 33 लाखांचा तांदूळ पनवेलमध्ये पकडला
Next Article नागपूरमधील साखर कारखान्यात स्फोट; पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू, वेल्डिंगचे काम करताना स्फोट

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?