Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उद्धव ठाकरेंनी दिली साद; ठाकरे गटाशी युतीबाबत आंबेडकरांचे सुचक विधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंनी दिली साद; ठाकरे गटाशी युतीबाबत आंबेडकरांचे सुचक विधान

Surajya Digital
Last updated: 2022/11/21 at 4:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ ‘प्रबोधनकार डॉट कॉम’चे झाले लोकार्पण

 

Contents
□ ‘प्रबोधनकार डॉट कॉम’चे झाले लोकार्पणस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 सुप्रिया सुळे म्हणाल्या; नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान’

मुंबई : वंचित बहुजन आघाडी येत्या काळात ठाकरे गटाशी युती करेल याबाबत प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले आहे. निवडणूक कधी होते त्यावर आम्ही ठरवू, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या स्टे ऑर्डरवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार चालले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जे कोणी गुलामगिरीला झुगारुन स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काम करतील, त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार असल्याचे ठाकरेंनी एका कार्यक्रमात म्हटले. Uddhav Thackeray gave a statement; Prabodhankar.com launch of Ambedkar’s suggestive statement on alliance with Thackeray group 

 

दिवंगत प्रबोधनकार ठाकरेंचा रविवारी स्मृतिदिन. त्या निमित्ताने दादरच्या शिवाजी मंदिरात ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शिवाजी नाट्य मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, संकेतस्थळाचे संपादक सचिन परब यांच्यासह शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी पहिल्यांदाच एका मंचावर उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आले होते. दरम्यान, येत्या काळात शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विविध विषयांवर भाष्य केले. वैदिक धर्म म्हणजे विधवांचं मुंडण करणारा तर संत परंपरा म्हणजे विधवांचे पुनर्विवाह करणारी, त्यामुळे लोकांनी काय निवडायचे ते ठरवावे. आजच्या काळात लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं भांडण सुरु आहे, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत की नव्याने काही उभारणार आहोत हा प्रश्न आहे. धर्मातील कोणते तत्वज्ञान घेऊन पुढे जायचे, हे ठरवायचा हा काळ आहे.

देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आपल्याला एकत्र यावेच लागेल. केवळ लोकांना जागे करून उपयोग नाही. आपण एकत्र येऊन हे काम करणार नसू तर दोघांना आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी साद घातली. यावर प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी दोनवेळा युतीसाठी साद घातली असताना रविवारी प्रथमच ठाकरे यांनी त्याला जाहीरपणे प्रतिसाद दिला.

 

》 सुप्रिया सुळे म्हणाल्या; नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान’

 

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात मी लिहीत नाही. ते काही चांगल्या गोष्टी देखील करत आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणात आपल्याला मराठी संस्कृती देखील जपायची आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्या पिंपरी येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी आज पिंपरी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात उपस्थित राहिले. तेव्हा त्या बोलत होत्या. हल्ली विरोधकांनी सरकारचं कौतुक करणं ही खरंतर दुर्मिळ बाब मानली जाते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत. असा उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

You Might Also Like

महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर

रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात

राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ

सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना

TAGGED: #UddhavThackeray #gave #statement #Prabodhankar #com #launch #Ambedkar's #suggestive #statement #alliance #Thackeraygroup, #उद्धवठाकरे #साद #ठाकरे #गट #युती #आंबेडकर #सुचक #विधान #प्रबोधनकरडॉटकॉम #लोकार्पण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शी । ही तर झेडपीची रंगीत तालिमच; कापसे आणि डिसलेंच्या राजकारणात तिस-याची एंट्री
Next Article ‘तारक मेहता’फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताचा अपघात

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?