नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विटरवरून अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. मात्र, काही मिनिटांतच त्यांनी हे ट्विट डिलिट केल्यानं गोंधळ उडाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्यावरील उपचारांना सात दिवस झाले असताना, भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी, अमित शहा यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती देणारे ट्विट केले. पण हे ट्विट त्यांना घाईचे ठरल्याचे समोर आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेनेही त्याची दखल घेत, अमित शहांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे ट्विट केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात खुलासा केला. अमित शहा यांची पुढची कोरोना टेस्ट करण्यात आलेली नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यानंतर मनोज तिवारी यांनी आपले ट्विट डिलिट केले आहे.
भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी ट्विटरवर पोस्ट करून गृहमंत्री अमित शाह यांनी करोनाला हरवलाचे म्हटले होते. मात्र, आता तिवारींनी टी पोस्ट डिलीट केली असून गृहमंत्रालयाने अखेरची चाचणी झाल्याचा दावा अयोग्य असल्याचे म्हटले आहे.’