Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

Surajya Digital
Last updated: 2023/08/06 at 10:16 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

□ जयंत पाटलांनी शाहांना भेटल्याचे वृत्त फेटाळले

 

मुंबई : आज सकाळी जयंत पाटील आणि केंद्रिय मंत्री अमित शाह यांच्यात भेट झाल्याची चर्चा आहे. लवकरच जयंत पाटील अजित पवार गटात सामील होऊन सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. जयंत पाटील अजित पवार गटात गेले तर हा शरद पवारांना मोठा झटका असेल.  A meeting between Jayant Patil and Amit Shah? Devendra Fadnavis answered Rajesh Tope Ajit Pawar ही भेट घेण्यापूर्वी अजित पवार यांनी पाटील यांना फोन करुन बोलवले असल्याची चर्चा आहे. तसेच शरद पवार गटातील अन्य चार आमदार अजित पवार गटात येणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.

 

मी पुण्याला गेलोच नाही. मी सकाळी साहेबांसोबत होतो. मी शाहांना कधी भेटलो नाही. माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अजित पवार गट व भाजपा अशा बातम्या पेरत आहे असे मी म्हणणार नाही. तुम्ही त्या बातम्या चालवत आहेत, असे जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले. मध्यरात्रीपर्यंत मी राजेश टोपे व अन्य नेते शरद पवारांसोबत होतो, असे पाटलांनी सांगितले. अशा बातम्यांनी माझीही करमणूक होत आहे, असेही ते म्हणाले.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. ‘जे डब्ल्यू मैरियट’ हॉटेलमध्ये राज्यातील दोन्ही नेत्यांनी शाहांची भेट घेतली. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारातील जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. काही लोकांना अफवा उठवायला खूप आवडतं. माध्यमांनी खात्री करुन बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील यांची कुठलीही भेट अमित शाह यांच्याशी झालेली नाही. जे पतंगबाजी करतायेत, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्तर ठेवावा, असे ते म्हणाले.

 

शरद पवार गटात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे दिग्गज नेते अजित पवार गटात जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्रसाद तनपुरे, राजेश टोपे व मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते. जयंत पाटील यांच्यासोबत शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक व सुनील भुसारा हेही अजित पवार गटात येऊ शकतात.

 

लवकरच जयंत पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेवर आता जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज सकाळपासून जयंत पाटील अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. याअगोदर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पाटील यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या चर्चांना आता जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. काही जण माझ्या संदर्भात चुकीची माहिती पसरवत आहेत. मी शरद पवार यांच्‍यासाोबतच आहे. मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटल्‍याच्‍या चर्चाही निराधार आहे, मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन, असंही जयंत पाटील म्हणाले.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #meeting #between #JayantPatil #AmitShah #DevendraFadnavis #answered #RajeshTope #AjitPawar, #जयंतपाटील #अमितशाह #भेट #देवेंद्रफडणवीस #उत्तर #राजेशटोपे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक
Next Article ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?