Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 64 लाखांचा प्रश्न अमिताभना पडला महागात, त्यांच्यासह सातजणांविरोधात तक्रार दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

64 लाखांचा प्रश्न अमिताभना पडला महागात, त्यांच्यासह सातजणांविरोधात तक्रार दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/11/27 at 12:02 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : यावर्षी महानायक अमिताभ बच्चन यांचा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ टीआरीपीच्या रेसमध्ये काहीसा मागे पडत आहे. त्याचप्रमाणे आता बच्चन यांच्यासह या कार्यक्रमाशी संबंधित 7 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मुजफ्फरपूर कोर्टात अमिताभ बच्चन यांच्यासह सात जणांविरोधात धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ शोच्या नव्या हंगामाची वाट पाहिली जाते. त्यांच्या सूत्रसंचालनाचे चाहते सर्वच वयोगटातील आहेत. दरम्यान यावर्षीच्या सीझनमध्ये केबीसीला टीआरपीबाबत काही संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे काही कायदेशीर बाबींना देखील सामोरे जावे लागत आहे. आता या कार्यक्रमाशी संबंधित 7 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या 7 जणांमध्ये अमिताभ बच्चन यांचे देखील नाव आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी 64 लाखांसाठी असा प्रश्न विचारला होता की, 25 सप्टेंबर 1927 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथातील पानं जाळली होती? या प्रश्नाच्या उत्तरासाठी  A. विष्णुपुराण, B. भागवत गीता, C. ऋगवेद  D. मनुस्मृति असे चार पर्याय देण्यात आले होते. हा प्रश्न जाणुनबुजून विचारून हिंदू भावनांना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप चंद्रकिशोर यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिकंदरपूरमधील रहिवासी असणारे आचार्य चंद्रकिशोर पराशर यांनी गुरुवारी सीजेएम कोर्टात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, क्विझ शोचे दिग्दर्शक अरुणेश कुमार, राहुल वर्मा, टिव्ही चॅनेलचे अध्यक्ष मनजीत सिंग, सीईओ एनपी सिंग आणि सहभागी स्पर्धक  बेजवाड़ा विल्सन या सात जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मीडिया अहवालांनुसार पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे शो मध्ये धर्मशास्त्रासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता, हा प्रश्न आणि त्याकरता देण्यात आलेले उत्तरासाठीचे पर्याय आक्षेपार्ह होते. यामुळे धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चंद्रकिशोर यांनी असा आरोप केला आहे की, 30 ऑक्टोबर रोजी ते केबीसीच्या सीझन 12 मधील एपिसोड पाहत होते, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांचं सूत्रसंचालन करत होते. यामध्ये बैजवारा विल्सन स्पर्धक होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी 64 लाख रुपयांसाठी जो प्रश्न विचारला तो आक्षेपार्ह होता, ज्यामुळे हिंदू भावनांना ठेच पोहोचली आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #कौनबनेगाकरोडपती #64लाखांचाप्रश्न #अमिताभना #पडलामहागात #सातजणांविरोधात #तक्रारदाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विजेचा दणका, मजूराला ५१ हजाराचे बिल, राज्य सरकारचा ‘हायव्होल्टेज’ धक्का
Next Article शिवसेनेच्या ताब्यातील बीएमसीला दणका, कंगनाला नुकसान भरपाई द्यावी लागणार

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?