Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादीचे अमोल कोल्हेंचे नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरुन स्पष्टीकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीचे अमोल कोल्हेंचे नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरुन स्पष्टीकरण

Surajya Digital
Last updated: 2022/01/20 at 10:02 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

मुंबई : खासदार अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. यावर कोल्हे यांनी आपली भूमिका role स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ‘या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार actor म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो.’ हा चित्रपट 30 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर OTT platform प्रदर्शित होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे ( Ncp leader Amol Kolhe) लवकरच नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, आता त्यांच्या या चित्रपटावरुनच एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. अमोल कोल्हेंचा हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटावर राजकारणातील काही दिग्गज नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, या चित्रपटावर अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

2017 मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण झालं, जेव्हा मी सक्रीय राजकारणात In active politics नव्हतो, किंवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी 100 टक्के सहमत असतो असंच नाही. काही भूमिकांशी आपण सहमत असतो, तर काहींशी आपण विचारधारेंशी सहमत नसतानाही भूमिका करतो.

मुळात माझ्या व्यक्तीगत आणि सार्वजनिक आयुष्यात नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधी हत्येच्या समर्थनार्थ भूमिका कधीही घेतली नाही. त्यामुळे केवळ एक कलाकार kalalar म्हणून भूमिका वटवणं आणि त्याचा राजकीय विचारांशी संबंध जोडला जाणं मला वाटतं या दोन विभिन्न गोष्टी आहेत. NCP’s Amol Kolhe’s explanation on the role of Nathuram Godse

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य  Freedom of expression आहे. एखाद्याला एक गोष्ट मांडायची आहे, आणि कलाकार म्हणून ते माझ्याकडे आले आणि मी ती भूमिका केली. इतकी साधी ती गोष्ट आहे. त्या विचारधारेचा जेव्हा मी प्रचार करतो, तेव्हा माझी विचारधारा Ideology काय आहे ती वेगळी गोष्ट आहे. मला वाटतं व्यक्ती म्हणून मला वैचारिक स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या दोन्हीचा आदर मी करतो.

सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. 2017 मध्ये म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी केलेला हा सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमात नेमकं काय आहे हे 30 तारखेला सिनेमा रिलीज cenima release  झाल्यानंतर मला कळणार आहे. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे, कलाकार आणि राजकीय भूमिका या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे आणि सुजाण नागरिक ही गोष्ट पाळतील अशी माझी खात्री आहे.

अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 2017 साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.”असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले.

एक कलाकार म्हणून आपल्याला ती भूमिका करणार का असे विचारण्यात आले आणि आपण ती भूमिका केली, असे त्यांचे म्हणणे आहे. आपली विचारधारा  वेगळी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आपल्या पक्षातील नेतेही याबाबत टीका करु शकतात, पण त्याचे आपल्याला वाईट वाटणार नाही, कारण आपली राजकीय विचारसरणी वेगळी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या वरीष्ठांना आपण याबाबत कल्पना दिलेली आहे, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

दरम्यान महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी ट्विटवर याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे, त्यात ते म्हणतात की, ” द्वेष पसरवण्यासाठी राबवले जाणाऱ्या मोहीमा, द्वेषातून केले जाणारे गुन्हे यावर चर्चा करण्यापेक्षा माध्यमं एका कलाकाराने आणि राष्ट्रवादीच्या खासदाराने नथुराम गोडसेची भूमिका साकारली यावर चर्चा करतो आहे. माध्यमांना हा कट कळलेलाच नाही” या शब्दात तुषार गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

TAGGED: #NCP's #AmolKolhe's #explanation #role #Nathuram #Godse, #राष्ट्रवादी #अमोलकोल्हे #नथुरामगोडसे #भूमिका #स्पष्टीकरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गर्लफ्रेंडच्या आईला किडनी दिली, पण गर्लफ्रेंडने दुसऱ्याशी लग्न केले
Next Article दोन लहान मुलीवर अत्याचार; समजले रूग्णालयात गेल्यावर, तक्रार देण्यास नकार

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?