अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमरावतीच्या दौऱ्यावर असून येथे विमानतळ लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी फडणवीस यांनी भाषणात बोलताना म्हणाले की, अमरावती येथे पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार असून यामुळे अमरावती जगाच्या नकाशावर येणार आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच केंद्राने पहिले विमान आम्हाला दिले, त्याच विमानातून आम्ही आलो आहोत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज या एअरपोर्टचे काम आपण पूर्ण केले. 2019 साली काम सुरू केले होते. मोदींच्या सरकारमध्ये प्रयत्न करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने काम हाती घेतले. धावपट्टीचे विस्तारीकरण केले, नवनीत राणा सोबत होत्या. त्यानंतर काही कारणाने बंद पडले होते. केंद्र सरकारशी संबंधित काम सुरू होते. राज्य सरकारशी संबंधित काम संथगतीने होते. पण शिंदे सरकार आल्यानंतर वेगाने काम सुरू झाले.देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने एअरपोर्टला पहिले विमान दिले. या विमानात बसून आम्ही आलो. अमरावती येथे सुरू झालेले हे विमानतळ आपल्याला अजून वाढवायचे आहे. जवळपास 3 हजार मीटर पर्यंत धावपट्टी बनवावी लागेल. ज्यामुळे अमरावतीच्या विमानतळावर कुठलेही विमान उतरू शकेल. यामुळे विदर्भात दुसरे मोठे विमानतळ उभे राहण्यास मदत होणार आहे. जिथे विमानतळ तिथे उद्योजक जातात, त्यामुळे विमानतळ महत्त्वाचे आहे.
साऊथ ईस्ट एशियामधली सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले, अमरावती येथे पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकनॉमिक अॅक्टिविटी सुरू होत आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. याचे वेगवेगळे फायदे आपल्याला मिळणार आहेत. रोजगार निर्मिती होणार आहे. म्हणून मला असे वाटते की मोदी सरकारच्या कार्यकाळात मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे. अमरावती हे केवळ एक विमानतळ म्हणून ओळखले जाणार नाही, तर जगाच्या पाठीवर साऊथ ईस्ट एशियामधली सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल आपल्या अमरावतीमध्ये सुरू होत आहे. अशी ओळख अमरावतीला मिळणार आहे.
सात लाख कोटींचे करार विदर्भातील
देवेंद्र फडणवीस म्हणले, मोदींना सात टेक्स्टाईल पार्क तयार करायचा ठरवले होते. त्यातील एक पार्क अमरावतीला देण्याचे मोदींनी मान्य केले. आता तो सुरू होतोय, 2 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आपला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबईशी जोडलो गेलो आहोत. राज्यात नवीन पोर्ट झाला. वाढवण बंदरलाही आपण जोड देत आहोत. त्यामुळे विदर्भ जेएनपीटीशी आणि वाढवण बंदरशीही जोडला जाणार आहे. त्यामुळे पोर्ट लेअर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सात लाख कोटींचे करार विदर्भातील असल्याचेही ते यावेळी म्हणाले