अमरावती, 16 मार्च (हिं.स.)
अमरावती जिल्हा वकील संघात सन २०१९ पासुन तर सन २०२४ पर्यंत जिल्हा व सत्र न्यायालय, इमारतीमधील वकील कक्षामध्ये स्वतःच्या हक्काची आसन व्यवस्था बसण्याकरीता मिळावी या करीता विविध अर्ज अमरावती जिल्हा वकील संघाकडे आले होते. ज्यामध्ये एकुण १४० अर्ज हे सन २०१९ ते २०२४ पर्यंतच्या अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारणीकडे प्राप्त झाले होते. त्याचे समाधन हे सन २०२४ च्या अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विश्वास एस. काळे, सचिव अॅड. चंद्रसेन गुळसुंदरे, उपाध्यक्ष अॅड. नितीन डी. राऊत, ग्रंथालय सचिव अॅड. मोहम्मद वसीम शेख व सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या अथक प्रयत्नाने नागपुर उच्च न्यायालयामधुन सदर आसन व्यवस्थे बाबत परवानगी घेऊन ज्येष्ठ व कनिष्ठ वकील सदस्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. यार्लगड्डा व अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विश्वास एस. काळे यांच्या हस्ते एकुण १४ टेबल खुर्चीसह प्रत्येकी टेबलवर ४ वकील अशी आसन व्यवस्था करून ५६ वकील सदस्य यांच्या आसन व्यवस्थेचे प्रश्न निकाली काढण्यात आला.
आसन व्यवस्थेची प्रक्रिया ही लकी ड्रा पध्दतीने करण्यात आली. तसेच उर्वरित सदस्यांना भविष्यात ज्या प्रमाणे जागा उपलब्ध होईल त्याप्रमाणे भविष्यात अमरावती जिल्हा संघ उपलब्ध करून देईल ह्याची ग्वाही दिली. सदर आसन व्यवस्थेमुळे वकील सदस्यांची आसन व्यवस्थेची सोय झाली असून त्यांच्या पक्षकारांनाही योग्य ठिकाणी जाऊन संबंधीत अधिवक्तांना शोधणे सोयीचे होणार आहे. सदर वकील सदस्यांना आपले दैनंदिन कामकाज करणणे सोयीचे ठरणार आहे. आसन व्यवस्थेकरीता उपाध्यक्ष अॅड. एन. डी. राऊत यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल अध्यक्षांनी त्यांचे कौतुक केले.