पंढरपूर, ७ ऑगस्ट –
अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडने सलग चौथ्या वर्षी पंढरपूर वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्यसेवेचा उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. १ ते ६ जुलै दरम्यान, हजारो किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा, विश्रांती आणि आवश्यक उपचार दिले गेले.
या उपक्रमात वारकऱ्यांना शारीरिक वेदना कमी करण्यासाठी पेन रिलीफ-ऑन, जॉइंट मसल स्प्रे, बॅकपेन रोल-ऑन, पेन बाम, ओआरएस पावडर व पिवळा बाम यांसारखी उत्पादने वितरित करण्यात आली. दिंडीत २५० किलोमीटरहून अधिक अंतर चालणाऱ्या वारकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला.
अमृतांजन हेल्थकेअरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. संभू प्रसाद म्हणाले, “लोकांच्या दैनंदिन आयुष्यासह धार्मिक वारीसारख्या क्षणांमध्ये त्यांची सेवा करणे हा आमचा वारसा आहे. वारकऱ्यांचे एकत्रित सामर्थ्य, त्यांची सहनशक्ती आणि श्रद्धा यांचा आम्ही सन्मान करतो. त्यामुळे ही सेवा आमच्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे.”
या उपक्रमातून अमृतांजन हेल्थकेअरने ‘काळजी आणि आरोग्य’ या मूल्यांवर आधारित आपली वचनबद्धता पुन्हा सिद्ध केली आहे. समाजात जेथे गरज आहे, तेथे मदतीसाठी तत्पर राहण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला आहे.