प्रतिनिधी
उत्तर सोलापूर
पाकणी ( ता. उत्तर सोलापूर) येथील एका हॉटेल समोर उभे केलेल्या इथेनॉल टॅंकरने पेट घेतला असून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.
पाकणी येथील एका हॉटेल समोर ३ इथेनॉलने भरलेले टॅंकर उभे केले असता पहाटेच्या वेळी आग लागली आहे.या आगीमुळे टॅंकर मध्ये असणारे इथेनॉल पेटल्याने परिसरात आगीच्य ज्वाला व धुरा मुळे परिसर हादरला होता.
आगीचे रुद्र रूप धारण होताच स्थानिक एका ने तालुका पोलीस स्टेशनला घटनेची खबर देताच तालुका पोलीस स्टेशन मधील पोलीस अग्निशमन दल यांनी धाव घेतली आहे.३ गाड्याच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे.वादळी वाऱ्यामुळे विजच्या तारेच्या घर्षणाने ठिणगी पडून आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक घटना म्हणून नोंद झाली असून पुढील तपास संजय देवकर करीत आहे.