Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री पांडुरंग कारखान्याच्या भालेकरांना वसंतदादा इन्स्टिट्यूटचा ऊस विकास पुरस्कार जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

श्री पांडुरंग कारखान्याच्या भालेकरांना वसंतदादा इन्स्टिट्यूटचा ऊस विकास पुरस्कार जाहीर

Surajya Digital
Last updated: 2022/01/04 at 2:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

श्रीपूर : पुणे ( मांजरी बु. ) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस (sugarcane) विकास अधिकारी हा महत्त्वपूर्ण पुरस्कार श्रीपूर येथील श्री पांडुरंग (pandurang) साखर कारखान्याचे (sugar factory) ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांना जाहीर झाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी या पुरस्कारांची घोषणा (announcement) केली.

महाराष्ट्रातील साखर उद्योगात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना व साखर कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन २०२०-२१  या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी हा पुरस्कार ‘पांडुरंग ‘चे सोमनाथ भालेकर यांना जाहीर (declared) झाला आहे. भालेकर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ मुख्य शेतकी अधिकारी संतोष कुमठेकर सर्व अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक सभासदांनी भालेकर यांचे अभिनंदन केले.

कोरोना संसर्गाच्या (Corona vairs)  पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरणाची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. आपल्या सर्वोत्कृष्ट कार्यामुळे देश व राज्य पातळीवरील ५० पेक्षा जास्त पुरस्कार मिळवणाऱ्या श्री पांडुरंग साखर कारखान्याच्या पुरस्कारांमध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून राष्ट्रीय साखर संघाने या कारखान्यास पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले आहे.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

पांडुरंग कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या वतीने कारखान्याच्या ऊस बेणे मळ्यात विविध वाणाचे बेणे तयार करण्याचे काम केले जाते. चांगला साखर उतारा व उत्पादन देणाऱ्या वाणांच्या ऊस बेणे व रोपांचा पुरवठा शेतकर्‍यांना केला जातो. त्याशिवाय जास्तीचे ऊस उत्पादन घेण्यासाठी कारखान्याने ‘सुपंत ‘ या ब्रँड खाली द्रवरूप जिवाणू खतांची निर्मिती करून त्याचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात आहे.

पाणी व माती परीक्षण करण्यासाठी कारखान्याने सुसज्ज अशी प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. चांगल्या दर्जाचा ऊस गाळपास येण्यासाठी कारखाना प्रशासनाचे व ऊस विकास विभागाचे विशेष लक्ष असते. या सर्व बाबींची दखल घेऊन सोमनाथ भालेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

* आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी हा पुरस्कार श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपुर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांना मिळाल्या बद्दल त्यांचा सन्मान श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन (chairman) प्रशांत परिचारक यांच्या हस्ते केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, माजी संचालक अरुण घोलप, शेती अधिकारी संतोष कुमठेकर, युटोपियन शुगर चे शेतकरी अधिकारी धनंजय व्यहवारे, राहुल नागणे उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Vasantdada #Institute's #Sugarcane #Development #Award #announced #ShriPandurang #factory, #श्री #पांडुरंग #कारखाना #भालेकर #वसंतदादा #इन्स्टिट्यूट #ऊसविकास #पुरस्कार #जाहीर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई जिल्हा बँकेतही भाजपचा दणदणीत विजय, सर्वच्या सर्व जागा भाजपकडे
Next Article सोलापुरात ड्रेनेजमधील कामगारांच्या मृत्यूप्रकरणी आमदारपुत्राला अटक, सुटका

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?