Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता

Surajya Digital
Last updated: 2021/02/04 at 12:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : लॉकडाऊनंतर आता राज्यात राजकीय रंग जोर धरु लागला आहे. तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तुलनेने महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदामध्ये रस दाखवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.


महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर आता नव्या पदांची नियुक्ती होत आहे. त्यातच राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरं उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, तर त्यांच्या जागी शिवसेनेच्या नेत्याची वर्णी लागू शकते.
त्याबदलत्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवं आहे. अशी माहिती समोर येत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा जोर धरत आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त होऊ शकतो. हे पद काँग्रेसने शिवसेनेला देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. मात्र त्याबदल्यात काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे.

काँग्रेसच्या या प्रस्तावाला शिवसेनेनेही अनुकूलता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. जर शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळणार असेल, तर सेनेसाठी ते फायद्याचं ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपद घ्या आणि उपमुख्यमंत्रिपद द्या अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे आता भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या आणि कशा हालचाली होतायेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #Another #DeputyChiefMinister #islikelytobe #formedinthestate, #राज्यात #आणखीएक #उपमुख्यमंत्रिपद #तयारहोण्याची #शक्यता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रत्यक्षात 3 फेब्रुवारीपर्यंत 734 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू, केंद्र सरकारच्या आकडेवारीवर नाराजी
Next Article अदानी समूहाच्या ऊर्जा व्यवसायाचे मूल्य दोन वर्षात तिपटीने वाढले

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?