Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: किरीट सोमय्यांनी ते जाहीर केले म्हणून त्यांचे धन्यवाद; तेव्हा काय बोबडी वळली होती का?’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

किरीट सोमय्यांनी ते जाहीर केले म्हणून त्यांचे धन्यवाद; तेव्हा काय बोबडी वळली होती का?’

Surajya Digital
Last updated: 2020/11/13 at 4:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून भाजपने शिवसेनेवर हल्ले शाब्दिक चढवले आहेत.  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे आणि अन्वय नाईक कुटुंबासोबत जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला उत्तर देत ‘तेव्हा काय बोबडी वळली होती का?’ असा सणसणीत टोला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी लगावला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आज्ञा नाईक आणि अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

किरीट सोमय्यांनी जे काही आरोप केले आहे, ते बऱ्याच लोकांकडून आता कळले आहे. पण, त्यामध्ये गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती त्यांना दिली. सोमय्या जे सातबारे दाखवत आहे, ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर कुणालाही पाहता येईल. उलट सोमय्यांनी ते जाहीर केले आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो’, असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसंच, ‘जमीन कुणीही विकत देऊ शकत नाही का? हा संपूर्ण योग्य मार्गाने व्यवहार झाला आहे. मुळात या आरोपांचा अन्वय नाईक यांच्या आत्महत्येशी काय संबंध आहे? नेमकं आताच सोमय्यांना याची आठवण कशी झाली, त्यांना काय दाखवायचं आहे. सोमय्यांनी आणखी मेहनत घेऊन कागदपत्र शोधून काढावी. जर काही मदत लागली तर मला सांगावे, मी मदत करायला येईल, असंही आज्ञा नाईक म्हणाल्या.

दरम्यान किरीट सोमय्यांनी काल गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंब आणि नाईक कुटुंबामध्ये 21 जमिनीचे व्यवहार झाले, असा दावा सोमय्यांनी केला होता.

* नाईक कुटुंबाचा संतप्त सवाल

‘किरीट सोमय्या यांना राजकारण करण्यासाठी काहीही मुद्दे आणू शकता. पण त्यांना आताच हे मुद्दे समोर आणण्यामागे कारण काय आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?’ असा थेट सवाल आज्ञा नाईकने सोमय्यांना विचारला आहे. 5 मे 2018 रोजी जेव्हा आम्ही अन्वय नाईक यांना अग्नी दिला होता. तेव्हा किरीट सोमय्या कुठे होते. त्यांची बोबडी वळली होती का? असा संतप्त सवाला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी विचारला आहे.

किरीट सोमय्या हे आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर ते जागे झाले. लोकं वस्तू विकत घेतात. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहे. सोमय्यांनी जमीन व्यवहाराचा या प्रकरणाशी संबंध जोडू नये, आता बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही’, असा इशाराही अक्षता नाईक यांनी दिला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #किरीट सोमय्यांनी #जाहीरकेले #धन्यवाद #तेव्हाकाय बोबडी #वळलीहोतीका?'
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नक्षलवाद समर्थक पुस्तक अभ्यासक्रमातून हटवले, कार्यवाहीला द्रमुक, माकपचा विरोध
Next Article मोठा दिलासा : महाराष्ट्रासह सहा राज्यांना केंद्राकडून 4 हजार 381 कोटींची मदत मंजूर

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?