Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोदींनी देशाला दिला नवा इव्हेंट, ‘नदी दिवस’ साजरा करण्याचं आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मोदींनी देशाला दिला नवा इव्हेंट, ‘नदी दिवस’ साजरा करण्याचं आवाहन

Surajya Digital
Last updated: 2021/09/26 at 4:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. मन की बातमधून मोदींनी देशाला एक नवीन इव्हेंट दिला आहे. आज विश्व नदी दिवस असल्याचं सांगत मोदींनी हा दिवस साजरा करण्याचं सूचवलं आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे, असं मोदींनी जनतेला संबोधित केलं आहे.

आजच्या रविवारचा 81वा ‘मन की बात’ कार्यक्रम झाला. त्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. आजच्या मन की बातमधून मोदींनी देशाला आणखी एक इव्हेंट दिला आहे. आज ‘विश्व नदी दिवस’ असल्याचे सांगत मोदींनी हा दिन साजरा करण्याचे सूचवले आहे.

सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा ‘एक डे’ आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील 365 दिवसांच्या ‘डे’चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे. आज विश्व नदी दिवस आहे, अशी आठवण मोदींनी आपल्या आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून करुन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मनकी बातमधून विश्व नदी दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. सध्या या आवाहनाचे स्वागत केले जात आहे.

आपण सर्वांनी दरवर्षी एक दिवस नदी दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण लहान – सहान घटनांमधून मोठी क्रांती होते. महात्मा गांधींनीही लहान-लहान प्रयोगातून मोठं काम केल्याचंही मोदींनी म्हटलं. नदी आपल्यासाठी भौतिक वस्तू नसून जिवंत साधनसंपत्ती आहे. म्हणूनच आपण नदीला आपली माता मानतो, आपले कितीही उत्सव, सण, पंरपरा आणि उमंग हे सर्व या मांतांच्या कुशीतच साजरे होतात.

गुजरातमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर जल-जलिनी एकादशी साजरी करण्यात येते. तसेच, बिहार आणि पूर्वेकडील भागात छठपूजा आयोजित केली जाते. त्यासाठी, किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली असेल, असे म्हणत प्रदुषणमुक्त नद्यांवरही मोदींनी मन की बात केली.

अधिक माहिती घेतली असता जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ब्रिटीश जलतज्ज्ञ मार्क अँजेलो यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मांडला. त्यांनी ब्रिटिश कोलंबियामधल्या अनेक नद्या स्वच्छ आणि सुडौल केल्या. त्यांचे एक वाक्य लक्षात राहिले, ”कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही.” संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयानुसार 2005 मध्ये जगातील 60 देशांनी जागतिक नदी दिवस साजरा केला. या वर्षी हा दिवस 27 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Modi #country #newevent #appeal #celebrate #RiverDay, #मोदींनी #देशाला #नवाइव्हेंट #नदीदिवस #साजरा #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले, तिघे जखमी
Next Article शिवसेनेचा अजित पवारांना गंभीर इशारा, विनापरवाना पुण्यात शिवसेनेचा मेळावा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?