Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना निर्बंधाबाबत पंढरपुरात झाली बैठक; व्यापारी व नागरिकांना अप्पर जिल्हाधिका-यांचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कोरोना निर्बंधाबाबत पंढरपुरात झाली बैठक; व्यापारी व नागरिकांना अप्पर जिल्हाधिका-यांचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2021/08/11 at 7:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर  : सोलापूर  जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा या पाच तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  निर्बंध  आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आज पंढरपुरात केले.

सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे कोरोना निर्बंधाबाबत  तालुक्यातील पदाधिकारी, व्यापारी व नागरिक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात होते. बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पिसे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पोलीस निरिक्षक अरुण पवार, किरण अवचर तसेच पदाधिकारी, व्यापारी, नागरिक आदी उपस्थित होते.

राज्यात सोलापूर, नगर, बीड  जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा  तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढता आहे. कोरोनाच्या पहिल्या  व दुसऱ्या लाटेचा  परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला होता. संभाव्य येणारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

प्रशासनाची भूमिका ही सर्वसमावेशक आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये  तसेच संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून  फौजदारी  प्रक्रिया संहिता 73 चे कलम 144 नुसार निर्बंध लागू करण्यात आले  असल्याचे  अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव  यांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जाधव यांनी सांगितले.  कोरोना संसर्गाच्या  पाहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कालावधीत  जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी  प्रशासनास सहकार्य केले आहे. सध्या काही ठिकाणी दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढती रुग्ण संख्या तसेच  संभाव्य येणारी तिसरी लाट पाहता प्रशासनास प्रतिबंधात्मक  कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे, अशा सूचना अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल  झेंडे यांनी दिल्या.

यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली तर  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांची तसेच रॅपिड अँटीजेन  तपासणी व लसीकरणाबाबत माहिती दिली.

पंढरपूर शहर व ग्रामीण भागाबाबत वेगळा निर्णय घ्यावा, वेळ वाढवावा तसेच कर माफ करावा आदी मागण्या यावेळी  व्यापाऱ्यांनी मांडल्या.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #meeting #Pandharpur #regarding #corona #restriction #Appeal #UpperCollector #traders #citizens, #कोरोना #निर्बंधाबाबत  #पंढरपुरात #बैठक #व्यापारी #नागरिकांना #अप्परजिल्हाधिका-यांचे #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोंबड्यालाही सोडवेना दारू, लागली दारुची चटक
Next Article नाशिक : लाचेच्या चौकशीनंतर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर – वीर फरार

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?