Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अरे देवा! आता नवं संकट, अज्ञात आजार आला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

अरे देवा! आता नवं संकट, अज्ञात आजार आला

Surajya Digital
Last updated: 2021/04/03 at 10:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

उटावा : अवघ्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता जगावर नवं संकट आलं आहे. कॅनडात एका गूढ आजारानं डोकं वर काढलं आहे. ४० पेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं संकट सरलेलं नाही तोपर्यंत हे दुसरं संकट आल्यानं जगभरात चिंता वाढली आहे. दरम्यान, कॅनडातील अनेक तज्ज्ञ हा मॅड काऊ (Mad Cow) डिसीज असल्याचा दावा करत आहेत.

जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूची साथ काही लवकर संपण्याची चिन्हे नाहीत, त्यातच आणखी एक संकट जगावर घोंघावायला लागलं आहे. एका गूढ आजारानं डोकं वर काढलं आहे.

मॅड काऊ नावावरूनच हा आजार गायीशी संबंधित असावा असा तर्क केला असेल, तर तो बरोबर आहे. गाय आणि तिच्यासारख्या पाळीव प्राण्यांमध्ये आढळणारा हा रोग आहे. या आजाराचं दुसरं नाव Bovine spongiform encephalopathy (BSE). हा गंभीर न्यूरॉलॉजिकल आजार आहे. Prion नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो. एका विशिष्ट प्रोटीनमुळे हा रोग होतो. हा एक न्युरॉलॉजिकल रोग आहे. यामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्याचे हाड नष्ट होते.

४० पेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडात या अज्ञात आजाराने थैमान घातलं आहे. सध्या डॉक्टर्स या रहस्यमय आजाराचा संबंध एका मेंदूच्या आजाराशी जोडत आहेत. अशा प्रकारच्या आजारांना क्रुत्झफेल्ट जॅकोब डिसीज अर्थात सीजेडी म्हणून ओळखलं जातं. कॅनडातील अनेक तज्ज्ञ हा मॅड काऊ (Mad Cow) डिसीज असल्याचा दावा करत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

२०१५ मध्ये क्रुत्झफेल्ट जॅकोब डिसीज अर्थात सीजेडी या आजाराचा सगळ्यात पहिला रुग्ण आढळला होता. त्या वेळी या आजाराचे ५ रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षी या आजाराचे २४ रुग्ण आढळले होते. आता २०२१ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक संख्येनं रुग्ण आढळले आहेत. कॅनडातील बर्टरेंड शहराचे महापौर वोन गोडिन यांनी सांगितलं की, कोरोनानंतरच लोक या गूढ आजारानं त्रस्त झाले आहेत.

* ही आहेत लक्षणे

मेंदूतील पेशींवर हल्ला करणाऱ्या या आजाराची लक्षणं या पेशींचं बरंच नुकसान झाल्यावर दिसायला लागतात. जर योग्य उपचार झाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू होतो. लक्षणं दिसायला १ ते २ वर्षे लागतात. माणूसाचा स्मृतिभ्रंश होतो, त्याच्या शरीरावरचं नियंत्रण कमी होतं आणि शेवटी शरीराचं संचालन करणारी यंत्रणाच निकामी होते.

हा आजार झालेली व्यक्ती गोष्टी विसरू लागते. तिला भ्रम होऊ लागतो. अंग दुखी, स्नायू आखडणे अशी लक्षणेही आढळतात. १८ ते ३६ महिन्यांच्या कालावधीत रुग्णांना जिथं मेंदूला ताण द्यावा लागतो अशी कामं करण्यात अडचणी येऊ लागतात. ताकद कमी होण्यासह दाताच्या दुखण्याच्या तक्रारीही सुरू होतात.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #Aredeva! #Now #Newscrisis #Unknown #Sick #MadCow, #अरेदेवा! #आता #नवंसंकट #अज्ञात #आजारआला #मॅडकाऊ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत कोरोनाचे 9090 रूग्ण आढळले, पालकमंत्री म्हणतायात लॉकडाऊन लावावाच लागेल
Next Article महाराष्ट्रात परीक्षा रद्द; पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी पास

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?