Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अर्णब गोस्वामींचा जामिन अर्ज फेटाळला; दिवाळी तळोजा कारागृहात की घरी? अलिबाग सत्र न्यायालय ठरवणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

अर्णब गोस्वामींचा जामिन अर्ज फेटाळला; दिवाळी तळोजा कारागृहात की घरी? अलिबाग सत्र न्यायालय ठरवणार

Surajya Digital
Last updated: 2020/11/09 at 7:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज सोमवारी मुंबई हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. अर्णब गोस्वाम यांनी उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सोमवारी उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता त्यांना अलिबाग सत्र न्यायालयामध्ये होणाऱ्या निर्णयावरच अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश देताना अर्णब गोस्वामी यांना सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यासोबतच, अर्णब यांच्या अर्जावर ४ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले होते.

आज उच्च न्यायालयाने जामीन अर्जच फेटाळून लावल्यामुळे अर्णब यांना आता अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून अर्णब यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामींची यंदाची दिवाळी तळोजा कारागृहात की घरी?, याचा फैसला आता अलिबाग सत्र न्यायालय करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अर्णब यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधी काही वेळ आधीच अलिबाग सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शनिवारी अर्णब यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी तात्काळ जामीन देऊ शकत नाही असं नमूद करत न्यायालयाने सर्व बाजू ऐकून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्याचवेळी अर्णब जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करू शकतात, असं देखील सांगितलं होतं. त्यानुसार, शनिवारी राखून ठेवलेला निर्णय आज उच्च न्यायालयाने दिला असून जामीन अर्ज फेटाळल्याचं स्पष्ट केलं आहे. अर्णब यांच्याबरोरच या प्रकरणातील इतर दोघे आरोपी फिरोज शेख आणि नितीश सारडा यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

दरम्यान, अर्णब यांची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी अलिबाग पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर सत्र न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली आहे. सध्या अर्णब गोस्वामी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांना जामिनासाठी अद्याप कोणत्याही कारागृहाने दिलासा दिलेला नाही.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #अर्णबगोस्वामी #जामीनफेटाळला #दिवाळी #कारागृहकीघरी #अलिबागसत्रन्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण; सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड
Next Article भाजपने पदवीधर – शिक्षक मतदारसंघाचे चार उमेदवार केले जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?