Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंटेनमेंट झोनमध्ये कर्मचा-यास मारहाण; पिता – पुञ दोघांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

कंटेनमेंट झोनमध्ये कर्मचा-यास मारहाण; पिता – पुञ दोघांना अटक

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 10:31 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अकलूज : अकलूज येथील रामायण चौकात कामावर असणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कंटेनमेंट झोनमध्ये भाजी विक्रीच्या कारणावरून भाजी विक्रेता व त्याच्या मुलाने जबर मारहाण केली. याबाबत ग्रामपंचायत कामगार गोविंद राजू साळवी यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गोविंद साळवी हा अकलूज ग्रामपंचायतीकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहे. रामायण चौक येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्यामुळे तेथे कंटेनमेंट झोन घोषित करून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास भाजी विक्रेता शिवाजी
कृष्णा चव्हाण (रा. अकलूज) हा आपली पॅजो (एमएच ४५ एई०१६९) गाडी घेऊन तेथे भाजी विक्रीसाठी आला व कंटेमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यास गोविंद साळवी याने मनाई करताच त्याने त्याचा मुलगा कुणाल चव्हाण यास बोलावून घेतले व दोघांनी मिळून शिवीगाळ करत गोविंद यास हात पिरगाळून मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचारी शिवरत्न लोंढे व खलील शेख हे तातडीने तेथे आले व भांडण सोडवून गोविंद यास पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथून गोविंद यास उपचाराकरीता दवाखान्यात नेण्यात आले. भाजी विक्रेत्यास व त्याच्या मुलास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोहेकॉ. संतोष मोरे करत आहेत.

“कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणार्‍या ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यास केलेली मारहाण निंदनीय आहे. आरोपींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती अकलूज पोलिसांना करण्यात आली आहे. नागरिकांनीही संयम न सोडता ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सहकार्य करावे. सर्वांच्या समन्वयानेच आपण कोरोनावर मात करू शकणार आहोत.”

– शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सरपंच, अकलूज

You Might Also Like

सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सोलापुरातून गोव्याच्या दिशेने उडणार विमान

पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

ब्रिक्स सदस्य राष्ट्र संसदांकडून दहशतवादाविरोधात सहयोगासाठी सहमती

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

TAGGED: #अकलूज #सरपंच #कंटेनमेंटझोन #मारहाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीची रयत शिक्षण संस्थेत ‘एंट्री’
Next Article तब्बल वीस गावच्या सरपंचांनी केली उपमुख्यमंञ्यांकडे तहसीलदाराच्या बदलीची मागणी

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?