Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या 7 जणांना अटक; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे स्पष्टीकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या 7 जणांना अटक; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे स्पष्टीकरण

Surajya Digital
Last updated: 2021/12/19 at 9:35 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बेळगाव : कर्नाटकच्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणारी घटना नुकतीच घडली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून या संशयीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. हे विकृत समाजकंठक कर्नाटकातील रणधीर सेनेशी संबंधित असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणांत तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना हुबळीत दिली.

बंगळूरातील घटनेचे पडसाद बेळगावात उमटले असून, २७ जणांना अटक झाल्याचे सांगितले. बंगळूरमधील शिवाजी महाराज आणि बेळगावातील संग्गोळी रायण्णा यांच्या मुर्तीची विटंबना झाल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद उमटले. बेळगाव शहरामध्ये निदर्शकांनी खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेवर दगडफेक करत हानी केली. बंगळूरमधील शिवाजी महाराज आणि बेळगावातील संग्गोळी रायण्णा यांच्या मुर्तीची विटंबना झाल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद उमटले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा, संग्गोळी रायण्णा देशभक्त होते. भाषा, जातीच्या पलिकडे काम केले. देशासाठी अतुलनीय योगदान दिले. समाज एकसंघ ठेवण्यासाठी काम केले. त्यांच्याबाबत भाषिक तेढ वा अपमान करणे योग्य नाही. गोंधळ मांजविणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कारवाई हाती घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची विटंबना केलेल्यांना अटक करण्यात आली असून, संग्गोळी रायण्णा यांच्या मुर्तींची विटंबना केलेल्यांना अटक करण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

छत्रपती शिवाजी महाराज माझा आदर्श असून त्यांच्याविषयी आदराची भावना असल्याचे स्पष्टीकरण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.

बंगळूर घटनेत तिघांना अटक झाली आहे. तर बेळगावातील घटनेत अटकेची कारवाई झाली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. पाळेमुळे खणून काढली जात आहेत.” कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध राज्यात मागील दोन दिवसांपासून तणावस्थिती आहे. विविध ठिकाणी समाजकंटक विरोधात कारवाई संदर्भात आंदोलन सुरु आहे.

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्याची माहिती आहे, असा प्रश्‍न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर त्याला मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्याची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. यामुळे माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल, असे उत्तर दिले.

भाषा आणि इतर मुद्द्यावरून हे लोक फूट पाडत आहेत. लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. त्यावर कठोर कारवाई करू. हे सर्व समाजकंटक आहेत. कारण मी सर्व देशभक्तांचा आदर करतो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कुणालाही दुखावलेले नाही. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही, ते माझ्या रक्तातच नाही. छत्रपती शिवरायांचा, संग्गोळी रायन्ना अशा देशभक्तांचा आदर केला पाहिजे हे आमच्या सरकारचे धोरण असल्याचे स्पष्टीकरण बोम्मई यांनी दिले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

TAGGED: #arrested #defaming #Chhatrapati #Shivaji #statue, #छत्रपती #शिवराय #पुतळा #विटंबना #अटक #बेळगाव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जवळ्यात दलित, मुस्लिम वस्तीवर बहिष्कार; शेकडो लोकांचा गावाशी संपर्क तुटला
Next Article ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याऐवजी दारू स्वस्त केली – अमित शाह

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?