Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात फायनल मॅचमध्ये सट्टा, सहाजणांना अटक; शेटफळजवळ अपघात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात फायनल मॅचमध्ये सट्टा, सहाजणांना अटक; शेटफळजवळ अपघात

Surajya Digital
Last updated: 2021/11/15 at 9:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : वर्ल्ड कप टी-ट्वेंटीच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये सट्टा घेणाऱ्या सोलापुरातील सहा जणांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

वर्ल्ड कप टी-ट्वेंटीच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये सट्टा घेणाऱ्या सोलापुरातील सहा जणांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

सचिन अंबादास कमलापुरे (वय – ३१ वर्षे रा. ४१९ साखरपेठ, सोलापूर सध्या घोंगडे वस्ती सोलापूर), मुकुंद अंबादास कमलापुरे (वय २६ वर्षे रा.४१९ साखरपेठ, सोलापूर सध्या घोंगडे वस्ती सोलापूर), दत्तात्रय पिट्टाप्पा बडगंजी (वय-३५ वर्षे रा.२७२८ जी ग्रुप वैष्णवी नगर, मारुती मंदिर जवळ, जुने विडी घरकुल सोलापूर), चणाप्पा सिध्दाप्पा पुरानिक (वय-३१ वर्षे रा.३३/३/७७ न्यु पाच्छापेठ, विजय नगर, सोलापूर सध्या-बोळकोटे नगर, सोलापूर), श्रीनिवास मुरली चिंता (वय-२६ वर्षे रा.३५५ पिट्टा नगर, जुने विडी घरकुल सोलापूर) व सतिश श्रीनिवास मंगलपल्ली (वय २७ वर्षे रा.१६६ राघवेंद्र नगर, जुने विडी घरकुल सोलापूर) या सहाजणांना ताब्यात घेतले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध

रविवारी २०-२० वर्ल्डकपची फायनल मॅच ऑस्ट्रेलीया विरूध्द न्यूझीलंड या दोन संघात झाली. या फायनल क्रिकेट सामन्यांवर सचिन कमलापुरे व मुकुंद कमलापुरे असे दोघे भाऊ मोबाईल द्वारे सट्टा खेळण्यास लोकांना प्रवृत करुन, स्वताचे आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणुक करून सट्टा घेतात, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी तात्काळ कारवाई करणे बाबत आदेश दिले.

त्यानुसार पोसई संदिप शिंदे व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून या सहाजणांना अटक केली. त्यांचेकडून क्रिकेट बेटींग सट्टा घेण्यासाठी लागणारे साहीत्य रोख रक्कम, सट्टा घेण्यासाठी वापरलेले मोबाईल फोन, टि.व्ही, ०१ मोटार सायकल व इतर साहीत्य असा एकुण ४ लाख ०९ हजार ८००रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

* शेटफळ जवळ अपघात दुचाकी चालक गंभीर

पुणे महामार्गावरील मोहोळ नजीक असलेल्या शेटफळ जवळ वेगाने जाणारी दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकल्याने प्रदीप पांडुरंग देशमुख (वय २६ रा. नारायणगाव (ता.जुन्नर जि. पुणे ) हा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. तो सोलापूर येथून पुणे येथे दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी हा अपघात घडला. त्याला रुग्णवाहिकेतून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची प्राथमिक  नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #arrested #betting #finalmatch #Solapur #Accident #Shetfal, #सोलापुरात #फायनल #मॅच #सट्टा #सहाजणांना #अटक #शेटफळ #अपघात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 1 कोटींचा बैल, वीर्य आहे महाग, 1 हजाराचा एक डोस
Next Article एसटीचे विलनीकरण शक्य नाही; राज्यावर आर्थिक संकट; पेट्रोल डिझेलवरील कर कपात शक्य नाही

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?