Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंटेनरला अडवून तीन गाड्या पळवणा-या तिघांना तेलंगणामधून अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

कंटेनरला अडवून तीन गाड्या पळवणा-या तिघांना तेलंगणामधून अटक

Surajya Digital
Last updated: 2022/03/01 at 2:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

● पोलिस अधीक्षक अमोल भारती यांची माहिती

मोहोळ : नवीन किया कंपनीच्या  कार गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरला इंडीका कार  आडवी लावून चालकाला मारहाण करित तीन गाड्या   पळवून नेल्या होत्या , त्या गाड्या व तीन जणांना तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, एम एच १२ एन एक्स ९८३४ या कंटेनरमधून चालक शिवम कुमार पांडे (वय-२८, रा. दामोदरपूर, ता. जि. बलिया) हे दोन पांढऱ्या रंगाच्या किया व एक काळ्या रंगाची किया अशा एकूण तीन कार या बेळ्यारी ते अहमदाबाद असे २४ फेब्रुवारी रोजी विजयपूर येथून घेऊन निघाला होता. दि. २५ रोजी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान मोहोळ ते मंद्रूप रस्त्यावर नजीक पिंपरी हद्दीमध्ये राजस्थानी ढाब्याजवळ सदरचा कंटेनर आला.

याचवेळी अज्ञात इंडिका कार त्या कंटेनरच्या समोर आडवी लावली तसेच ऑइल बॉक्सला त्यांनी काहीतरी फेकून मारले. त्यामुळे चालकाने काहीतरी नुकसान झाले आहे का, म्हणून कंटेनर सावकाश रोडच्या खाली घेतला असता इंडिका कारमधील चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाला पकडून मारहाण केली. त्या चार चोरट्यांनी गाडीचा पडदा वर करून पाहिला असता सदर कंटेनरमध्ये कार असलेले दिसले. Three arrested from Telangana for hijacking three vehicles

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यातील तीन नवीन विना नोंदणी केलेल्या या कंपनीच्या तीन गाड्या धमकी देत मारहाण करून चोरून नेल्या.

याप्रकरणी चालक शिवम कुमार पांडे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्यांच्या मागावर पाठवले होते. पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद डावरे, पांडुरंग जगताप यांचे पथक हैदराबाद कडे रवाना झाले होते.

या तीन पैकी दोन गाड्यांना GPS सिस्टीम होती. त्यामुळे या गाड्या तेलंगणामध्ये नेमक्या कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत हे लक्षात आले. त्यानुसार तेथील पोलिसांशी संपर्क साधून या गाड्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तोपर्यंत मोहोळ पोलिस त्या ठिकणी पोचले एक चोरटा व दोन जण गाड्या विकत घेवून कमीशनवर पुढे विकणारे असे तिघांना ताब्यात घेण्यात आले.

नियाज रशीद मोहमद (वय ३०) हरियाना शोयब महंमद  सय्यद (रा हुबळी कर्नाटक) शेखर गोडा  दुडडन गौडा हळी  (रा बेल्लाळी कर्नाटक) यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील आरोपीचा तपास सुरु असल्याचे  अमोल भारती यांनी सांगितले.

 

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Three #arrested #Telangana #hijacking #vehicles, #कंटेनर #अडवून #तीनगाड्या #तिघांना #तेलंगणा #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिट अँड रन नुकसान भरपाईची रक्कम 2 लाखांवर, भरपाई 8 पट वाढली
Next Article राष्ट्रद्रोह्यांशी संबंध ठेवणाऱ्या मलिकांना देशभक्त करण्याचा प्रयत्न

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?