नांदेड, 10 सप्टेंबर।
मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटिअर (1920) नुसार अनुसूचित जमाती वर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड यांनी दिले आहे.बंजारा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यावे अशी विनंती केली आहे
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार तुषार राठोड यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेतली.