Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आषाढी वारी : यंदाही वारक-यांचा विठुरायाशी दुरावाच, दुमदुमलेली पंढरी दिसत्याय सामसूम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

आषाढी वारी : यंदाही वारक-यांचा विठुरायाशी दुरावाच, दुमदुमलेली पंढरी दिसत्याय सामसूम

Surajya Digital
Last updated: 2021/07/19 at 11:19 AM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाची वारक-यांना आस लागली आहे. मात्र भाविकांना यंदाही आषाढी सोहळ्याला मुकावे लागणार आहे. प्रथेनुसार विठ्ठल – रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. गेल्यावर्षीसारखे यंदाही वारक-यांचा विठुरायाशी दुरावाच राहणार आहे. हा दुरावा, विरह वारक-या असह्य होत आहे. प्रतिवर्षी टाळ-मृदगांसह जयघोषाने दुमदुमणारी पंढरी वारक-यांविना सामसूम दिसत आहे.

महापूजेनंतर मंदिर समितीने केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानंतर संत कान्होपात्राचे झाड म्हणून ओळख असलेले तरटीचे झाड वयोमानाने वाळले आहे. त्या ठिकाणी नवे तरटीचे रोपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान, गेल्यावर्षी सारखं होऊ नयेhttps://t.co/BgksDC2JJL

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021

महापूजेसाठी मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी दाम्पत्य, मंदिर समितीचे सहअध्यक्ष, पालकमंत्री यांनाच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सुरवातीला गाभाऱ्यात मंदिराचे पुजारी असतील. त्यावेळी मंदिरातील चारखांबीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांची उपस्थिती असेल. तर सोळखांबीत मंदिर समितीचे 14 सदस्य, सल्लागार समितीचे नऊ सदस्य, विभागीय आयुक्‍त, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रांताधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

विठू माउली #vaari #mauli #alandi #dehu #PandharpurWari #wari #pandharpur #Maharashtra #ekadashi pic.twitter.com/QSApVaAFBU

— Rahul Punde (@rrpunde) July 19, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून शनिवारी मंदिर समितीचे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांची तुकाराम भवन येथे चाचणी करण्यात आली. हा अहवाल रविवारी प्राप्त झाला. अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना मंदिरातील कार्यक्रमास प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाडी यांनी दिली.

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहर व लगतच्या नऊ गावांमध्ये काल रविवारपासून (ता. 18) संचारबंदी  लागू करण्यात आली आहे. त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर बंद असले तरी नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत शनिवारी भाविकांनी गर्दी केली होती. वारक-यांच्या पंढरीत संचारबंदी लागू झाली असून अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आला आहे.

पंढरपुरातील इतर कोणालाही अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, यादृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त नियुक्‍त केला आहे. पंढरपूरकडे येणारे सर्व 48 मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात केले आहेत. कोणालाही पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जात नाही. पोलिसांनी शहरातील 500 पेक्षा जास्त मठांची तपासणी करून संचारबंदीपूर्वी शहरात येऊन मठात राहिलेल्या वारकरी आणि भाविकांना विनंती करुन परत पाठवले आहे.

दरम्यान, या महापूजेच्या निमित्ताने मंदिर समिती प्रशासनाची लगबग सुरू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी, विठ्ठल सभामंडप, चौखांबी, सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा सजविण्यात आला आहे.

Pandharpur Wari reaches #SupremeCourt#SupremeCourt to hear a plea stating that Maharashtra govt denying permission to millions of warkaris (pilgrims) & 250 plus registered palkis to complete annual pilgrimage to Lord Vithal Temple violates their fundamental rights pic.twitter.com/0UwOosifAJ

— Bar and Bench (@barandbench) July 19, 2021

कोरोना महामारीमुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी यात्रा सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात साजरा होत आहे. यात्रा सोहळ्यादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून 18 ते 25 जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात संचारबंदी लागू केली आली आहे.

पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट व सर्व घाट आणि मंदिर परिसरामध्ये 18 जुलै सकाळी सहा वाजल्यापासून ते 25 जुलै सायंकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर पंढरपूर शहरालगतच्या भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, कोर्टी, गादेगाव, वाखरी, शिरढोण व कौठाळी या नऊ गावांमध्ये 18 जुलै रोजी सकाळी 6 ते 22 जुलै सकाळी सहा पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तर पंढरपूर शहर व गोपाळपूरमध्ये 18 जुलै रोजी सकाळी सहापासून ते 24 जुलै सायंकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे.

https://twitter.com/Gauravjubre/status/1416994640486539264?s=19

पंढरपूर शहरामध्ये रविवारपासून संचारबंदी असल्यामुळे परगावच्या भाविकांनी काल शनिवारीच मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. श्री विठ्ठल मंदिर बंद असल्यामुळे श्री संत नामदेव पायरीचे दर्शन घेत भाविकांनी समाधान मानले. मागील वर्षी आषाढी व कार्तिकी यात्रा रद्द झाल्याने पंढरीला येता आले नाही. उद्यापासून पंढरपुरात संचारबंदी असल्याने आजच पंढरीत दाखल झालो आणि चंद्रभागेचे व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन धन्य झाल्याची प्रतिक्रिया वारक-यांमधून येत आहे.

आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिस प्रशासनाच्या वतीने त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहर व परिसरात बारा ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रे उभारण्यात आली आहेत. चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी भाविकांना मज्जाव करण्यात आला आहे. तर चंद्रभागा काठावरील सर्व घाटांवर बॅरिकेड लावून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

गर्भवती महिलांना कोरोना लस देणारी राज्यातील पहिली सोलापूर महानगरपालिका, 99  गर्भवती महिलांना दिली लस , पालकमंत्र्यांकडून कौतुक
https://t.co/YXSAbF3NNK

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 19, 2021

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #AshadiWari #year #Waraks #far #Vithuraya., #आषाढीवारी #वारक-यांचा #विठुरायाशी #दुरावाच #दुमदुमलेली #पंढरी #सामसूम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गर्भवती महिलांना कोरोना लस देणारी राज्यातील पहिली सोलापूर महानगरपालिका 
Next Article अवैधपणे तांदूळ वाहतूक करणारा ट्रक मंद्रूप हायवेवर पकडला

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?