Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘विठ्ठल’चा चेअरमन विधानसभेच्या आखाड्यात उतरतोच; विठ्ठल परिवाराला मिळाले आक्रमक नेतृत्व
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

‘विठ्ठल’चा चेअरमन विधानसभेच्या आखाड्यात उतरतोच; विठ्ठल परिवाराला मिळाले आक्रमक नेतृत्व

Surajya Digital
Last updated: 2022/07/08 at 2:39 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

Contents
□ विठ्ठलसह पंढरपूरच्या राजकारणातही परिवर्तन□ अभिजित पर्वाची सुरुवात□ भगीरथ भालकेंचा जनसंपर्क झाला कमी□ अभिजित पाटील यांनाच का मतदान का ?□ 21 पैकी 20, निर्विवाद वर्चस्वस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ गटनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –□ विठ्ठल कारखाना या हंगामात होणार सुरू

□ विठ्ठलसह पंढरपूरच्या राजकारणातही परिवर्तन

 

पंढरपूर – उद्योगपती अभिजीत पाटील यांनी वारसदार प्रस्थापितांना जोरदार धक्का देत विठ्ठल कारखान्यावर परिवर्तन घडविले असून यामुळे आता तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराला आक्रमक व कर्तृत्ववान नेतृत्व मिळाले आहे. विजयानंतर पाटील यांनी थेट परिचारक गटाला आव्हानं देत आपला इरादा जाहीर केल्याने आता विठ्ठल परिवाराला आश्‍वासक नेता मिळाल्याचे चित्र होते. ‘Vitthal Sugar Factory Chairman is entering the assembly arena; The Vitthal family got aggressive leadership in Pandharpur

 

□ अभिजित पर्वाची सुरुवात

विठ्ठलचा चेअरमन पुढचा आमदार समजला जातो किंवा तो निवडणुकीच्या आखाड्यात उतरतो, हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. आतापर्यंत औदुंबर पाटील, राजाभाऊ पाटील, वसंतराव काळे आणि भारत भालके विठ्ठलचे चेअरमन होते. यातील औदुंबर पाटील आणि भालके हे आमदार झाले आहेत. तर राजाभाऊ पाटील आणि वसंतराव काळे यांनी आमदारकीची निवडणूक लढली आहे. आता अभिजित पाटील कोणत्या आणि कशा परिस्थिती निवडणुकीच्या रिंगणात उतरतात याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.

 

त्यांना अनेकांनी राजकारणात या असा केलेला आग्रह पंढरपूरच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतो असं राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. पंढरपूर वासीयांना राजकारणात एका नवीन चेहऱ्याची प्रतीक्षा होती. ती प्रतिक्षा आता संपल्याचे विठ्ठल कारखान्याच्या निकालानंतर दिसून येत आहे. विठ्ठलवरील विजयाच्या निमित्ताने पंढरपूरच्या राजकारणात अभिजित पर्वाची सुरुवात झाली म्हणण्यास हरकत नाही.

 

□ भगीरथ भालकेंचा जनसंपर्क झाला कमी

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पांडुरंग व विठ्ठल परिवारातच सहकार व राजकारणातील संघर्ष होत आला आहे. स्व. भारत भालके यांनी 2009 मध्ये आमदारकी मिळवित 1980 नंतर प्रथमच परिवाराला हा बहुमान मिळवून दिला होता. 2020 पर्यंत ते अकरा वर्षे आमदार होते. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष बनले तसेच त्यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविली. मात्र ते पराभूत झाले. यानंतर त्यांनी जनसंपर्क कमी केला होता. याच काळात अभिजीत पाटील यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली. ते राज्यात चार साखर कारखाने यशस्वीपणे चालवित असून धाराशिव, नांदेड, नाशिक व सांगोला भागात त्यांचे कारखाने आहेत.

 

□ अभिजित पाटील यांनाच का मतदान का ?

मागील तीन वर्षात दोन हंगाम विठ्ठल कारखाना आर्थिक अरिष्टामुळे बंद राहिला होता. यामुळे सभासदांमध्ये नाराजी होती. पाटील यांनी मागील हंगामात बंद राहिलेल्या विठ्ठल कारखान्याच्या साडेसहा हजार सभासदांचा ऊस सांगोला कारखान्यात गाळला होता. यामुळे सहाजिकच सभासदांमध्ये अभिजीत पाटील यांच्याविषयी स्नेह वाढला होता.

भगीरथ भालके यांचे नॉटरिचेबल राहणे, ऊसबिल थकणं यासह कारखाना बंद व कर्जांचा डोंगर यामुळे सभासदांनी या निवडणुकीत चार कारखाने चालविणार्‍या अभिजीत पाटील यांना मतदान केल्याचे दिसत आहे.

अभिजीत पाटील यांनी भालके- काळे पॅनलबरोबरच युवराज पाटील यांच्या गटाचाही पराभव केल्याने आता ते विठ्ठल परिवारातील नेतृत्व पुढे आले आहेत. त्यांनी आपला इरादा जाहीर करत परिवारातील नेत्यांवर विजयानंतर कोणतीही टीका न करता विरोधक असणार्‍या माजी आमदार प्रशांत परिचारक गटावर टिकेची झोड उठविली आहे. यावरून ते आता राजकारणात जास्त सक्रिय राहणार याचे संकेत मिळत आहेत.

 

□ 21 पैकी 20, निर्विवाद वर्चस्व

 

विठ्ठल कारखान्यावर अभिजीत पाटील यांनी निविर्वाद वर्चस्व  मिळवले. एकवीस पैकी वीस जागा जिंकल्या, शहरात व कारखान्याव भव्य स्वागत पंढरपूर – गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजीत पाटील प्रणित विठ्ठल परिवर्तन आघाडीने एकवीस पैकी 20 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/576777300666670/

विजयानंतर पाटील यांची भव्य मिरवणूक समर्थकांनी काढली होती. त्याचे कारखाना कार्यस्थळावरही भोंगा वाजवून स्वागत करण्यात आले. कामगारांनीही जल्लोष केला.  5 जुलै रोजी मतदान झाले होते. तर बुधवारी 6 रोजी मतमोजणीस सुरूवात झाली. जवळपास 24 तास मतमोजणी सुरू होती. गुरूवारी सकाळी अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली.

या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अभिजीत पाटील यांनी भगीरथ भालके व युवराज पाटील यांच्यासारख्या मातब्बर पॅनलना पराभूत करत एकहाती सत्ता मिळविली आहे. केवळ संस्था मतदारसंघात त्यांचा उमेदवार पराभूत झाला व येथून भालके गटाचे समाधान काळे 64 मतं घेवून विजयी झाले.

बाकी ऊस उत्पादक व अन्य गटात अभिजीत पाटील गटाचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे मतांचे अंंतर हे आठशे ते अठराशे इतके मोठे आहे.

□ गटनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

 

तुंगत गट- अभिजीत पाटील प्रवीण कोळेकर , करकंब- दत्तात्रेय नरसाळे, नवनाथ नाईकनवरे, कालिदास साळुंखे ,कासेगाव- सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, प्रेमलता बब्रुवान रोंगे, भाळवणी- साहेबराव नागणे, धनंजय काळे, कालिदास पाटील , मेंढापूर- दिनकर चव्हाण, जनक भोसले ,सरकोली- संभाजी भोसले, सचिन वाघाटे , अनुसूचित जाती मतदारसंघ- सिताराम गवळी इतर मागास वर्ग- अशोक जाधव संस्था मतदारसंघ- समाधान काळे, महिला प्रतिनिधी- कलावती महादेव खटके, सविता विठ्ठल रणदिवे, भटक्या विमुक्त जाती- सिद्धेश्‍वर शंकर बंडगर

 

या निवडणुकीत तीन पॅनल असल्याने मोठी चुरस होती. प्रस्थापित असणार्‍या भालके व काळे तसेच युवराज पाटील व गणेश पाटील या दोन्ही पॅनलना अभिजीत पाटील यांनी डॉ.बी.पी.रोंगे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांना बरोबर घेवून आव्हानं दिले होते.

 

□ विठ्ठल कारखाना या हंगामात होणार सुरू

 

मतदारांनी अभिजित पाटील यांच्यावर विश्‍वास दाखवत कारखाना ताब्यात दिला आहे. दरम्यान विजयानंतर पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून तेथेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी कारखाना या हंगामात सुरू केला जाईल, असे सांगत थकीत ऊसबिल देण्याची ग्वाही दिली. तसेच यापुढे तालुक्यात ऊसदराची स्पर्धा होईल असे सांगत परिचारकांच्या पांडुरंग परिवाराला खुले आव्हानं दिले. यानंतर कारखान्यावर ते गेले असता कर्मचार्‍यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कारखान्याचा भोंगा वाजविण्यात आला. या ठिकाणी त्यांनी कर्मचारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/577004603977273/

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Vitthal #Sugar #Factory #Chairman #entering #assembly #arena #Vitthalfamily #aggressive #leadership #Pandharpur #AbhijitPatil, #विठ्ठल #साखर #कारखाना #चेअरमन #विधानसभा #आखाड्यात #उतरतोच #विठ्ठलपरिवार #आक्रमक #नेतृत्व #पंढरपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
Next Article शिवसेनेचा निवडणूक चिन्ह टिकवण्यासाठी धावपळ, ‘धनुष्यबाण’ आमचाच : उध्दव ठाकरे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?