Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्वतःसह वरिष्ठाच्या नावाने पैशाची लाच मागणा-या लाचखोर एएसआयला ठोकल्या बेड्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

स्वतःसह वरिष्ठाच्या नावाने पैशाची लाच मागणा-या लाचखोर एएसआयला ठोकल्या बेड्या

Surajya Digital
Last updated: 2023/07/12 at 4:53 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 कोर्टात काम करत असताना युवा वकिलाला हृदयविकाराचा झटका

सोलापूर : दाखल तक्रारी अर्जानुसार कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी पाच लाख रूपयांची लाच मागून त्यापैकी तीन लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी शहरातील एका सहायक पुलीस फौजदाराविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. Assistant Sub-Inspector of Police handcuffed to bribe-taking ASI in name of senior including himself

दाखल असलेल्या तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांना सहकार्य करण्यासाठी तसेच पिकअप गाडी सोडण्याकरिता स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

संजय मनोहर मोरे (57, पद – एएसआय, नेमणूक – विजापूर नाका पोलिस स्टेशन, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरूध्द विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांना सहकार्य करून त्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल न करण्याकरिता तसेच विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये जमा करून घेतलेली पिकअप गाडी सोडण्याकरिता सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मोरे यांनी त्यांच्याकरिता तसेच विजापूर नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनपुडे पाटील यांच्याकरिता तक्रारदाराकडे 5 लाखाच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, पहिला हप्ता म्हणून 3 लाख रूपयाची लाच स्विकारण्यास संमती दिल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, पोलिस अंमलदार सलिम मुल्ला आणि चालक राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 कोर्टात काम करत असताना युवा वकिलाला हृदयविकाराचा झटका

सोलापूर : कोर्टातच काम करत असताना एका युवा वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ॲड. श्रीकांत डमडेरे (वय ३६) असे निधन झालेल्या वकिलाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.11) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटना कळताच सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीकांत हे गेल्या दोन-तीन दिवसापासून आजारी होते. ते मंगळवारी कोर्टात कामकाजासाठी आल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोर्ट परिसरातील पार्किंगजवळ असतानाच अचानक खाली कोसळले. हे चित्र पाहिल्यानंतर उपस्थित सहकारी वकिलांनी त्यांना लगेच गाडीमधून उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये नेले; पण त्यांचा उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

 

दरम्यान, एका युवा वकिलाचा काम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.ते मागील काही वर्षांपासून ॲड. राज पाटील यांच्याकडे काम करत होते. ते जवळपास १५ वर्षांपासून वकिली व्यवसायात होते.

 

 

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #solapur #Assistant #Sub-Inspector #Police #handcuffed #bribe-taking #ASI #name #senior #policeinspector, #स्वतःसह #वरिष्ठ #नावाने #पैसा #लाच #लाचखोर #एएसआय #ठोकल्या #बेड्या #सहाय्यक #पोलीसउपनिरीक्षक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंत्रीमंडळ विस्तार : रात्रभर बैठकावर बैठका, फडणवीस दिल्लीला रवाना तर पवारही जाणार
Next Article दक्षिण सोलापूर  । राजकीय खळबळ : भंडारकवठेचे सरपंच चिदानंद कोटगोंडे यांचे सरपंचपद रद्द

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?