मुंबई, 3 जून (हिं.स.)। एथर एनर्जी लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने अलीकडेच महाराष्ट्रात धाराशिव येथे आपले 55वे एक्सपिरीयन्स सेंटर (EC) उघडून एक महत्त्वाचा टप्पा पार केला. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र राज्यात आपली उपस्थिती वाढवण्यावर एथरने लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून, आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची, विशेषतः रिझ्टा या एथरच्या पहिल्या फॅमिली स्कूटरची वाढती बाजारपेठ आणि मागणी पूर्ण करणे शक्य होऊ शकेल.
गेल्या दोन महिन्यांत, एथरने वसई, सोलापूर, हडपसर, भुसावळ, मालेगाव, चाळीसगाव, कुडाळ, धाराशिव, नाशिक, सावेडी, उद्यम नगर आणि बार्शी यांसारख्या महाराष्ट्रातील 16 शहरांत नवी एक्सपिरीयन्स सेंटर्स सुरू केली आहेत. राज्यभरात EVs ची वाढती मागणी पाहता, आगामी महिन्यांत देखील आणखी ECs उघडून आपली उपस्थिती वाढवण्याची एथरची योजना आहे. एक्सपिरीयन्स सेंटर्स व्यतिरिक्त, महाराष्ट्रात एथरची 39 सर्व्हिस सेंटर्स (SCs) आहेत,
त्यापैकी नाशिक, वसई आणि कोल्हापुरात तीन गोल्ड सर्व्हिस सेंटर्स आहेत. EV दुचाकी ईकोसिस्टम मजबूत करण्यासाठी आणि एथरच्या मालकांना त्रास-मुक्त अनुभव देण्यासाठी एथरने राज्यभरात आपले एथर ग्रिड फास्ट चार्जिंग जाळे पसरले आहे. 31 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रात 524 एथर ग्रिड फास्ट चार्जर्स आणि नेबरहूड चार्जर्स आहेत. एथर ग्रिड हे भारतातील सर्वात व्यापक दुचाकी फास्ट चार्जिंग नेटवर्क आहे. 31 मार्च 2025 रोजीच्या आकडेवारीनुसार, एथरने देशभरात 3578 फास्ट चार्जर्स आणि नेबरहूड चार्र्स स्थापित केलेली आहेत.
कंपनीच्या या विस्ताराबाबत बोलताना एथर एनर्जी लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री. रवनीत सिंह फोकेला म्हणतात, “महाराष्ट्रात आमचे 55वे एक्सपिरीयन्स सेंटर सुरू होत असल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र ही पहिल्यापासून आमची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. रिझ्टाच्या लॉन्चने येथील मागणीला चालना देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. मुंबई, पुण्यापासून ते भुसावळ आणि बार्शी या उभरत्या EV केंद्रांपर्यंत आम्हाला लोकांची इलेक्ट्रिक दुचाकींबद्दलची वाढती रुची आणि अंगिकार दिसत आहे. आणि या प्रतिसदामुळेच महाराष्ट्रात आमचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. एकीकडे आमचा ग्राहक बेस वाढत आहे आणि त्याचवेळी त्यांच्यासाठी एक सशक्त ईकोसिस्टम उभारण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, मग ते सार्वजनिक चार्जिंग नेटवर्क विस्तारित करणे असो किंवा सर्व्हिस सपोर्ट मजबूत करणे असो.”
एथरने अलीकडेच 2025 एथर 450 लॉन्च केली आहे. 2025 एथर 450 X आणि एथर 450 अॅपेक्स मॉडेल्समध्ये मल्टी-मोड ट्रॅक्शन कंट्रोल, मॅजिकट्विस्टTM आहे- जे आधी एथर अॅपेक्समध्ये दिले होते; आणि एथर 450X 3.7kWh (IDC रेंज 161 किमी) आणि एथर 450S (IDC रेंज 122 किमी) वर 130 किमी पर्यंत सुधारित ट्रूरेंजTM सज्ज आहे. 450X 2.9kWh (IDC रेंज 126 किमी) आणि एथर 450S (IDC रेंज 122 किमी) या मॉडेल्ससाठी देखील आता 105 किमी पर्यंत सुधारित ट्रूरेंजTM मिळणार आहे. मल्टी-मोड ट्रॅक्शन कंट्रोलच्या मदतीने चालक रेन मोड, रोड मोड आणि रॅली मोड या तीन मुख्य मोड्समधून नियंत्रणच्या गरजेनुसार निवड करू शकतात. हा प्रत्येक मोड त्या त्या विशिष्ट राइडिंग परिस्थितीशी सुसंगत बनवला आहे.
रिझ्टा या एथरच्या पहिल्या फॅमिली स्कूटरची मागणी नव्या बाजारपेठांमध्ये देखील वाढत आहे. रिझ्टा दोन मॉडेल्स आणि तीन व्हेरियन्टमध्ये उपलब्ध आहे: 123 किमी IDC रेंज असलेली रिझ्टा S आणि रिझ्टा Z तसेच 159 किमी IDC रेंज असलेली रिझ्टा Z. रिझ्टाची सीट मोठी आणि आरामदायक आहे. एकंदर स्टोरेज स्पेस 56L आहे, ज्यात 34L इतकी जागा सीटच्या खाली आणि 22L फ्रंक अॅक्सेसरीचा पर्याय आहे.
—————