Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळमध्ये प्राणघातक हल्ला; कुरेशी मोहल्यातील ११ जणांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मोहोळमध्ये प्राणघातक हल्ला; कुरेशी मोहल्यातील ११ जणांवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/08/18 at 10:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ येथील जहीर खैरादी याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या प्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना काल मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोहोळ कुरुल रस्तावर आसरा हाँटेलजवळ असणाऱ्या दोस्ती पान दुकानाजवळ  घडली. जहीर इक्बाल खरादी (वय३४ रा.बागवान नगर, मोहोळ) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जहीर खरादी हा कुरुल रोडवरील फाटे मंंगल  कार्यालयाजवळ पान दुकान  चालवतो. सदाम कुरेशी व नजीम  कुरेशी हे जहीरचे चांगले जवळचे मित्र आहेेत.  त्यांच्यासोबत तो नेेहमी  फिरत होता.  मंजूर कुरेशी, शहाबाद   कुरेशी, गौस कुरेशी  , तौफीक कुरेशी, नयुम कुरेशी ,अनिस कुरेशी ,  नूर  कुरेशी , रिजवान कुरेशी , शोएब  कुरेशी, अजिम कुरेशी, महंमद कुरेशी हे  तलवार, सतुर, चाकू लोखंडी  सळई, स्टंप घेवून  मंगळवारी संध्ययाकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास  आले.

यावेळी  जहीर हा त्याच्या सोमनाथ पवार या मित्रासोबत  थांबला होता. आलेल्या सर्वांनी जहीरजवळ जावून तुला कीती वेळा सांगीतले तु सदाम कुरेशी व नजीम कुरेशी यांच्यासोबत फिरू नको म्हणून असे म्हणत त्यास मारण्यास सुरुवात केली. तलवार, सत्तूर, चाकू, लोखंडी सळई, स्टंपने लाथा बुक्याने मारू लागले. अनिस कुरेशी हा याला खलास करा जीव मारून टाका, असे ओरडत मारत होता. या हल्ल्यात जहीर खरादी हा गंभीर जखमी झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्याचा मित्र सोमनाथ पवार याने सोडवा सोडवी केली. यात जहीरच्या दोन्ही हातावर, डाव्या डोळ्याजवळ पोटावर, पाठीवर, पायावर  चाकू व तलवारीचे वार झाले आहेत. संपूर्ण शरीराला मुका मार लागला आहे. यात दिवसभर पान दुकानाची विक्रीत जमा झालेले साडेचार हजार रुपये गल्ल्यातुन काढून घेतले, दुकानातील फ्रीज व इतर सामानाची मोडतोड केली, दुकानाचीही मोडतोड केली असे फिर्यादीत म्हटले आहे. यात ११ जणांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

*  रस्ता ओलांडताना रेल्वेच्या धडकेने वृद्ध ठार

सोलापूर  – घराजवळील रेल्वेचे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने ८० वर्षाचे वृद्ध गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात आज बुधवारी सकाळच्या सुमारास घडला. शिवाजी नारायण सुरवसे (वय८०रा.हिरज ता.उत्तर सोलापूर) असे मयताचे नाव आहे. ते आज सकाळी १० वाजेच्या सुमारास हिरज रिक्षा स्टॉप जवळील रूळ ओलांडत होते. त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना नातू देवानंद जगदाळे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मरण पावले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Mohol #Assassination #Attack #Qureshi #Mohalla #Crime #Filed, #मोहोळ #प्राणघातक #हल्ला #कुरेशी #मोहल्यातील #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शाहरुखच्या लेकीचे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
Next Article 15 लाखांच्या नोटांनी सजली महादेवाची पिंड

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?