Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रेशन धान्याच्या काळाबाजारप्रकरणी नगरसेवक प्रशांत कथले फरार; अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरगुन्हेगारी

रेशन धान्याच्या काळाबाजारप्रकरणी नगरसेवक प्रशांत कथले फरार; अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी

Surajya Digital
Last updated: 2020/09/01 at 7:26 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

बार्शी : रेशन धान्याच्या काळाबाजारप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात नाव आल्याने स्वीकृत नगरसेवक प्रशांत रावसाहेब कथले फरार आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे.

नगरसेवक कथले यांनी गेल्या पंचवार्षिकला नगराध्यक्षपदाचीही निवडणूक लढविली होती. त्यामध्ये ते पराभूत झाले होते. गेल्या महिन्यात पनवेल येथे बार्शी तालुक्यातून काळाबाजारात गेलेले रेशनचे लाखो रुपयांचे धान्य सापडल्यानंतर बार्शी तालुक्यातही शोध मोहीम राबविण्यात आली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यावेळी वैराग येथील उपबाजार समितीतील आडत व्यापारी सतीश अंबऋषी खेंदाड याच्या गाळ्यात तांदळाच्या 50 किलो वजनाच्या 257 गोण्या व गव्हाच्या 94 गोण्या आढळून आल्या होत्या. त्यात एकूण 17,550 किलो धान्य होते. त्याची बाजारभावाने किंमत 5 लाख 26 हजार रुपये होते.

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस नाईक संदेश कृष्णदेवराय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गाळाधारक आडत व्यापारी सतीश खेंदाड यास अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत प्रशांत कथले यांचे नाव उघड झाले आहे. त्यामुळे अटकेची शक्यता निर्माण झाल्याने कथले फरार झाले आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #काळाबाजार #बार्शी #नगरसेवक #प्रशांतकथले #जामीन #अर्ज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन; चार दिवसांपूर्वी जिवंत समाधीची अफवा
Next Article रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या..! राज्यभर रेल्वेची बुकींग उद्यापासून होणार सुरु

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?