Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न : महाराष्ट्रातील जतमध्ये कर्नाटकने सोडले पाणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न : महाराष्ट्रातील जतमध्ये कर्नाटकने सोडले पाणी

Surajya Digital
Last updated: 2022/12/01 at 10:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सांगली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आहे. दरम्यान कर्नाटकने आज महाराष्ट्रातील जत भागातील काही भागात पाणी सोडले आहे. कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडले आहे. यातून महाराष्ट्राला खाली दाखवण्याचा प्रयत्न केल्याची नागरिकांची भावना आहे.  Attempt to defeat Maharashtra: Karnataka left water in Maharashtra’s Jat

 

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागात ४२ गावांच्या दाव्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. मात्र, या तापलेल्या वातावरणात कर्नाटकाकडून काल बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तिकोंडी तलाव एकाच दिवसात ओहरफ्लो झाला आहे. शिवाय, दाव्याप्रमाणे कर्नाटक नैसर्गिकरित्या या वंचित गावाला न्याय देऊ शकतो, असे भासविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे.

 

महाराष्ट्राने पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता दिली. असं असतानाही जतमध्ये अलिकडच्या काळात दिवसेंदिवस काही ना काही घडामोडी घडत आहेत. आजही दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्‍यावर असतानाच कर्नाटकने सोडलेल्या पाण्याने पूर्व भागातील तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला असल्याचं समोर आलं आहे.

कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्‍वर योजनेतून पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावांवर कर्नाटकने हक्क सांगितला असताना पूर्व भागाचा प्रलंबित पाणी प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जत पूर्व भागातील 65 गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजनेला राज्य सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे. ही योजना पूर्ण होईपर्यंत तातडीने पूर्व भागातील काही तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून घेता येउ शकतील का? याचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाहणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी जत दौर्‍यावर होते.

 

कर्नाटकने सीमावर्ती भागासाठी तुबची बबलेश्‍वर योजना गतीने पूर्ण केली. या योजनेतून कर्नाटकातील इंडी आणि चडचणसाठी जत पूर्व भागातील तिकोंडीसह काही गावातून नैसर्गिक उताराने पाणी जाऊ शकते. याच स्थितीचा फायदा उठवत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने बुधवायपासून या योजनेचे पाणी यतनाळ ओढापात्रात सोडले. या पाण्यामुळे तिकोंडी तलाव आज गुरूवारी (ता.1 डिसेंबर) ओसंडून वाहू लागला आहे. या कृतीद्वारे सीमावर्ती भागास कर्नाटकच तातडीने पाणी देऊ शकते हे दाखविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केलाय.

दरम्यान, म्हैसाळ विस्तारित योजनेबाबत वस्तुस्थिती निदर्शक अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना शासनाने दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी आज गुरूवारी जतचा पाहणी दौरा केला. जिल्हाधिकार्‍यांनी आज तिकोंडी तलावाची पाहणी केली, तसेच श्रीक्षेत्र गुड्डापूर येथे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेउन उमदीचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी जतच्या भौगोलिक स्थितीची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍याकडून नकाशाद्वारे घेतली.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Attempt #defeat #Maharashtra #Karnataka #left #water .Maharashtra's Jat, #maharashtra #jatt, #कर्नाटकने #सोडले #पाणी, #महाराष्ट्र #डिवचण्याचा #प्रयत्न #सांगली #जत # कर्नाटक कने सोडले पाणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिद्धेश्वर साखर कारखान्याने केला रास्ता रोको; चिमणी बचाव, कारखाना बचाव’च्या दिल्या घोषणा
Next Article Gold mines चंद्रपूर, सिंधुदुर्गात सोन्याच्या खाणी, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आमच्या काळात…

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?